अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी शेवगाव ता. परंडा येथील आदिवासीची खरेदी जमीन शासनाच्या ताब्यात घेतल्याचा निर्णय मा. उच्च न्यायालयात कायम
मौजे शेवगाव येथील गट नंबर ११०७ मधील २ हेक्टर ८१ आर जमीन सिलिंग कायद्याअंतर्गत आदिवासी उदाशा दगडू शिंदे यांना मिळाली होती. परंतु पांढरेवाडी येथील भानुदास शेतीबा जाधव यांनी उदाशा दगडू शिंदे यांच्या मालकीची जमीन स्वतःकडे खरेदीखताने घेण्यासाठी त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांची स्वतःची २ एकर ८१ आर जमीन अदलाबदलीद्वारे देण्याचा करार करून उपजिल्हाधिकारी भूसुधार उस्मानाबाद यांच्याकडून २०/१२/२०१८ रोजी अदलाबदलीच्या शर्तीच्या अधीन राहून दोन्ही जमिनी अदलाबदलीचे खरेदीखत करण्याची परवानगी दिली होती. परंतु भानुदास शेतीबा जाधव यांनी आदिवासीकडून त्यांची जमीन खरेदीखताद्वारे घेतली पण स्वतःची जमीन अदलाबदलीने आदिवासी यांना दिली नाही व आदिवासी उदाशा दगडू शिंदे यांची फसवणूक केली व शर्तीचा भंग केला व त्यामुळे सदरील खरेदीखत रद्द करावे अशा आशयाची तक्रार आदिवासी यांची सून द्वारकाबाई शिबिर शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे दिली होती. सदरील तक्रारीची चौकशी होऊन अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी खरेदीदार भानुदास शेतीबा जाधव यांनी सिलिंग कायद्याच्या व उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दिलेल्या खरेदी कराराचा भंग केला असल्यामुळे सदरील जमीन गट नंबर ११०७ मौजे शेवगाव ता. परंडा २ हेक्टर ८१ आर शासनास जमा केली होती सदरील आदेशाच्या विरोधामध्ये भानुदास शेतीबा जाधव यांनी महाराष्ट्र महसूल न्यायधीकरण यांच्याकडे केलेले अपील फेटाळण्यात आले त्यानंतर भानुदास शेतीबा जाधव यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मध्ये याचीका क्रमांक ४८५०/२०२२ दाखल करून अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तसेच माननीय महसूल न्यायाधिकरण यांचा निर्णय मा. उच्च न्यायालयात आव्हान केले होते सदरील याचीकेची सुनावणी दिनांक ०२/०६/२०२५ रोजी न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांच्यापुढे झाली असता माननीय उच्चन्यायालयाने अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी वरील जमीन शासनास जमा करण्याचे आदेश कायम केले.
प्रतिवादीच्या वतीने ॲड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी काम पहिले तर त्यांना ॲड. राकेश ब्राम्हणकर, ॲड. रवींद्र वानखेडे, ॲड. सोनाली गणेश सोमवंशी ॲड. गौरव खांडे यांनी सहकार्य केले तर याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. यु.आर. आवटे यांनी काम पहिले.
stay connected