श्री. छञपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून मांडवा येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष लागवड

 श्री. छञपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून मांडवा येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष लागवड




आष्टी (प्रतिनिधी) 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी संचलित श्री. छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या आंधळे ऋषिका, गुंड शिवानी, रानवळकर पल्लवी, ढेकळे कादंबरी, पठाण सफिया, राखे अंकिता, घेवंदे पुनम, जाधव ऐश्वर्या यांनी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत मांडवा गावात ०१ जुलै रोजी कृषी दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवा येथील विद्यार्थांच्या प्रभात फेरीने झाली.

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी योगदान यांविषयी कृषिकन्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी दिनाची पार्श्वभूमी, कृषी दिनाचे महत्त्व आणि कृषिप्रधान देशात कृषी दिन एक पावन पर्व म्हणून का ओळखला जातो 



या संदर्भात माहिती दिली. कृषि दिनानिमित्त कृषि कन्यांकडून गावामध्ये वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीकन्यांनी गावकऱ्यांना

वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले तसेच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी मंडळ  कृषी अधिकारी मा. श्री. जगधने एस. ए. यांनी पीकविमा व इतर योजनांचे शेतकर्यांना मार्गदर्शन केले व कृषी महाविद्यालय, आष्टी येथील उद्यान विभागाचे प्रा. म्हस्के ए. एम. यांनी फळबाग लागवडी विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले व गावाचे सरपंच मा. श्री देवा धुमाळ, उपसरपंच श्री. संतोष मुटकुळे,  सहाय्यक कृषी अधिकारी मा. टकले मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिंदे एस. ए. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. जगन्नाथ सोनवणे सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरसूळ एस. आर., कार्यक्रम समन्वयक प्रा. तांबोळी आय. एम. व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.