काँग्रेस पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी सय्यद फारूखभाई यांची सार्थ निवड

 

काँग्रेस पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी सय्यद फारूखभाई  यांची सार्थ निवड






आष्टी (प्रतिनिधी) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव राज्यसभा खा. रजनीताई अशोकराव पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांनी शुक्रवार  दि. ४ जूलै रोजी बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यामध्ये आष्टी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सय्यद फारूखभाई यांना देण्यात आली.  सय्यद फारूखभाई  हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्वपरिचित धडाडीचे नेतृत्व असुन मागील कार्यकाळात पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी निवड करत नियुक्तीपत्र देण्यात आले. ही निवड सार्थ व सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारी असुन पक्ष संघटन वाढीसाठी महत्वाची ठरणार आहे. आष्टी तालुक्यातील वाडी वस्ती गाव खेड्यांपर्यंत असलेला प्रत्यक्ष संपर्क तसेच तालुकाभरात सर्वपरिचित व पुर्णवेळ लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सय्यद फारूखभाई  सारख्या नेतृत्वामुळे आष्टी तालुका व मतदार संघात काँग्रेस पक्षाला निश्चित बळकटी मिळेल. त्यांच्या निवडीबद्दल त्यांना लोकनेत्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनेसह अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षातच न्याय मिळतोच . सय्यद फारूखभाई  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झाल्यानंतर बोलताना म्हणाले की, मी मागील अनेक वर्षाच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती म्हणुन माझे नेते माजी मंत्री अशोकराव पाटील साहेब, खासदार रजनीताई अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांनी माझ्यावर ज्या विश्वासाने पक्ष संघटन वाढीसाठी आष्टी तालुकाध्यक्ष पदाची अतिशय महत्वाची जबाबदारी दिली त्या विश्वासाला कधीही तडा न जावु देता आष्टी तालुक्यातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, त्याच बरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका देखील आम्ही ताकतीने लढू आणि जिंकू असे काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सय्यद फारूखभाई  यांनी सांगितले







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.