*अनुस्पर्श फाऊंडेशन चा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम*
जाटदेवळे - सध्या चालू असलेल्या आषाढी वारीच्या पायी दिंडीचे वातावरण सगळीकडे आपणांस पाहायला मिळताना दिसत आहे काही दिंड्या संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई यांच्या पालखी मार्गी मागे पुढे सोबत चालत आहेत तर काही मानाच्या व मोठमोठाल्या दिंड्याचा मार्ग हा थेट आपल्या मूळ ठिकाणावरून पंढरपूरकडे आपणास पाहायला मिळतो. अशा या आनंदी वातावरणामध्ये आपण पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती करावी असा एक मानस अनुस्पर्श फाउंडेशन यांनी आयोजित करून शक्य होईल तेवढ्या आषाढी वारीच्या पायी जाणाऱ्या दिंडी करीता मुक्कामाच्या ठिकाणी प्रस्थान समयी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे फाउंडेशनचे सचिव डॉ. उध्दव घोशीर यांनी ठरविले आहे.
अशा या अनोख्या उपक्रमा मार्फत संतांच्या व भाविक भक्तांच्या मार्फत पर्यावरणाचे महत्त्व रुजविले जावे.
याकरिता अनुस्पर्श फाउंडेशन दिंडीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणच्या स्नेही परिवाराच्या घरी गावातील सरपंच, गावकरी, यांना संपर्क करून या सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन दिंडीतील महाराजांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यासाठी एक झाड आणि त्या झाडाच्या संरक्षणासाठी जाळीचे कुंपण देऊ केले आहे. जर आपण धार्मिक कार्यामधून संतांच्या हस्ते पर्यावरणाचा संदेश समाजामध्ये पेरला तर तो नक्किच लवकर रुजवला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने यावर्षी एक झाड हवे असल्यास केशर आंबा ही देण्यात येत आहे जेणेकरून ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल त्या ठिकाणच्या स्नेह परिवाराचे त्या वृक्षास प्रेम लाभेल आणि संतांच्या हस्ते केलेल्या वृक्षरोपणाची एक कायमस्वरूपी फळे चाखताना आठवण राहील असा या उपक्रमाचा प्रमुख हेतू दिसून येतो आहे. पुढील वर्षी दिंडीतील भाविकांच्या संख्येइतके वृक्षारोपण करण्याचे नियोजन त्या गावच्या सरपंच व इतर नागरिकांशी आव्हान करून तसे पुढे नियोजन करण्याचा ही मानस बाळगण्यात आला आहे.
चालू या वर्षी शक्य असेल त्या दिंड्यांना आव्हान केले असून त्यांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाची छोटीशी सुरुवात ह. भ. प. महंत सुदर्शन मुनी महाराज उदासीन (सुदर्शन गड शिंदेवाडी - जाटदेवळा) पायी दिंडी च्या प्रस्थान प्रसंगी आपल्या मूळ ठिकाणापासून वृक्षारोपण करून दिंडी प्रस्थान करण्यात आले. दिंडी मार्फत पर्यावरण जनजागृती व संवर्धन याची सुरवात आज या वेळी केली गेली. यावेळी दिंडी मध्ये उपस्थित असलेले ह. भ. प. ऋषी महाराज तांगडे, ह. भ. प. सुदाम महाराज पवार, डॉ.उध्दव घोशिर, बाबासाहेब झरांडे, उध्दव आठरे आदी व्यक्ती समवेत भाविक भक्त ही उपस्थित होते.
stay connected