निराधारांच्या मानधनासाठी तहसीलच्या दारात रिपाईचे उपोषण आठ दिवसात थकीत मानधन देण्याची पत्राद्वारे ग्वाही

 निराधारांच्या मानधनासाठी तहसीलच्या दारात रिपाईचे उपोषण
आठ दिवसात थकीत मानधन देण्याची पत्राद्वारे ग्वाही 




-------------------

राजेंद्र जैन / कडा

---------------

तालुक्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, रमाई घरकुल, तसेच पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थींचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे. या मागणीसाठी रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थींच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या दारात मंगळवारी उपोषण करण्यात आले.

 

याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. की मागील सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना तसेच रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल या योजनेच्या अनेक लाभार्थींचे मानधन व घरकुलाचे हप्ते थकीत असल्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्या थकीत योजनेच्या लाभार्थींच्या मानधनासह घरकुलाचे हप्ते त्वरित देण्यात यावेत. या मागणीसाठी तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या दारात लाभार्थींसह उपोषण करण्यात आले. याप्रसंगी तहसील कार्यालय व पंचायत समिती विभागाच्या प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट देऊन आठ दिवसात थकीत मानधन व घरकुलाचे हप्ते देण्यात येतील. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

-------%%------

 

--------------

साहेब, आमचं तेवढं पैसं द्या..?

--------------------

ज्येष्ठांना मिळणारे थकीत मानधन पदरात पाडून घेण्यासाठी थरथरत्या हातातील काठी टेकवट-टेकवत गावखेड्यातून वयाची नव्वदी पार केलेल्या आजीबाई उपोषणस्थळी आल्या. साहेब, आमचं तेवढं पैसं द्या की, म्हणून विनवणी करीत होत्या, आश्चर्य म्हणजे या आजीबाईंनी मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतलं.

--------%--------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.