जनता जुनिअर कॉलेज धानोऱ्याची उज्वल यशाची परंपरा कायम
जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका आष्टी या शाळेचा बारावीचा निकाल नुकताच घोषित झाला असून तीनही शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे .
विज्ञान शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान कु. ढेरे प्रणिती शिवाजी हिने पटकावला असून तिला 90.00% मार्क्स मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक कु. ढोबळे श्रेया अनिल आणि कु.आडकर अपूर्वा नंदकुमार या मुलींनी पटकावला असून त्यांना 89.33% मार्क्स मिळाले आहेत .
तर तृतीय क्रमांक कु.ढवळे नंदिनी महेंद्र हिने मिळवला असून तिला 88.33% गुण मिलाळे आहेत.
विज्ञान शाखेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होणारे एकूण 225 विद्यार्थी आहेत.
तर कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान कु. शिंदे पायल बाळासाहेब हिला 83.17
तर द्वितीय क्रमांक कु. पवार निकिता नंदू 82.83 तर तृतीय क्रमांक लगड सागर सुभाष 81.33 कला शाखेत 24 विद्यार्थी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेत कु. सरोदे स्नेहा दत्तात्रय 79.00 टक्के घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे , द्वितीय क्रमांक शेख सोहेल राजू 78.67% गुण मिळवून उत्तीर्ण झाला असून तृतीय क्रमांकावर तमनर स्वरूप राजेंद्र व कु.शेख साजिया जमीर यांनी प्रत्येकी 76.33% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत
वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्याने चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक वर्गाचे संस्था सचिव मा. विजयकुमार बांदल अण्णा संस्था अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई व्यवस्थापक विशाल भैया बांदल आणि प्राचार्य श्री सय्यद वाय.यू.सर उप प्राचार्य कर्डिले सर उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.
stay connected