लांडग्यांनी पाडला आठ शेळ्यांचा फडशा धामणगाव येथील घटना
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील धामणगाव येथील राहुल बाबासाहेब चौधरी यांच्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या शेळ्याच्या कळपात लांडग्याची टोळीने हल्ला करत आठ शेळ्यांचा फडशा पडल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धामणगाव येथील चौधरी वस्ती येथे घडली.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील पाथर्डी मार्गावरील चौधरी वस्ती येथे लांडग्यांनी १३ शेळ्यावर हल्ला केला. यात ८ शेळ्या ठार झाले. राहुल चौधरी यांची आई घरा पाठीमागे शेळ्या बांधून स्वयंपाक करण्यास आले होत्या. शेळ्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांनी पाहिलं तर दहा ते बारा लांडगे शेळ्यांना मारून ओढत घेऊन जात होते. या घटनेमुळे सदरील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदरील शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
मात्र पशु वैद्यकीय अधिकारी डॉ . विष्णु साबळे यांच्याशी तेजवार्ता ने संपर्क केला असता केवळ दोन शेळ्या लांडग्यांनी ठार केल्याचे त्यांनी सांगितले .
stay connected