बौद्ध धम्म हाच मानव कल्याणाचा मार्ग आहे.प्रा.डॉ.संबोधीताई देशपांडे
--------------------------------------------------
संदिप जाधव/आष्टी
भारत देशात महीलांसाठी तीन क्रांत्या झाल्या.पहीली क्रांती तथागत भगवान गौतम बुद्धांची, दुसरी क्रांती सम्राट अशोकांची आणि तिसरी क्रांती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची.
या तिन्ही क्रांत्या महीला मुक्तीसाठी होत्या.असे प्रतिपादन प्रा.डॉ संबोधीताई देशपांडे यांनी कडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथे दिनांक 9 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रा डॉ संबोधीताई देशपांडे या धम्मक्रांती आणि स्त्री मुक्ती याविषयावर बोलताना म्हणाल्या की, पहीली क्रांती करणारे
तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांच्या काळात म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वी महीलांना हीन लेखले जात असत.विधवा महीलांना,परितक्ता महीलांना,वेश्या व्यवसाय करणाऱ्या महीलांना अशा अनेक महीलांना वाळीत टाकले जायचे, परंतु अशा महीलांना तथागतांनी धम्म उपदेश दिला.भिक्खू संघा बरोबरच महीलांनाही भिक्खूंनी करुन संघात सामिल केले.
ज्या महीलांना हीन वागणुक दिली जायची अशा महीलांना तथागतांनी ज्ञानार्जन करण्याचा अधिकार दिला.विविध ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची परवानगी दिली.
दुसरी क्रांती करणारे सम्राट अशोक यांच्या काळात सम्राट अशोकांनी आपल्या राज्यांमध्ये महीलांवर अन्याय अत्याचार होऊ दिले नाही.ते महीलांचा खुप आदर, सन्मान करत असत,त्यांनी विविध ठिकाणी चांगले कामे केली.बोधीवृक्ष लावले.स्तुप बांधले भिक्खूसाठी विविध उपाययोजना राबवल्या एवढेच नाही तर त्यांनी आपले स्वत:चे दोन मुले, मुलगी संघमित्रा व मुलगा महिंद्रा यांना बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले.
तिसरी क्रांती करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त महीलांना मनुस्मृती दहन करुन स्वातंत्र्य बहाल केले.
मनुस्मृती मध्ये महीलांना कुठेच बाहेर जाण्याचा,खाण्याचा,पिण्याचा कसलाच अधिकार नव्हता.चुल आणि मुल हे सोडता स्त्रीने काहीच करायचे नाही.
महीलेने कोणतीही गोष्ट स्वातंत्र्यपणे करायची नाही.अशा विविध बंधनात महीलेने राहायचे जणू काही गुलामच असे मनुस्मृतीत लिहीले होते.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करुन सर्व महीलांना स्वातंत्र्य दिले.हिंदु कोडबिलाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महीलांसाठी सर्व सामान हक्क दिले.पुरुषाप्रमाणे महीलानांही समान अधिकार दिले.त्यामुळे आज प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी महीला दिसत आहे.असे मौलिक व मार्मिक मार्गदर्शन प्रा.डॉ.संबोधीताई देशपांडे यांनी उपस्थितांना केले.
stay connected