*मनुवादी हरले संविधान अन कायदा जिंकला- डॉ.जितीन वंजारे*
*परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी चळवळीतील आंदोलकाला स्वतः कोर्टात केस लढवून आदरणीय एड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. या सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी आंदोलनात व्हिडिओ सूट का करतोय? म्हणून बेदम मारल्याने त्याचा जीव गेला होता.अशी अनेक प्रकरणे पोलिसात जातात पण त्याच काहीच होत नाही, पोलीस प्रशासन त्याला जबाबदार असत पण कायद्याचा योग्य वापर केला आणि कायद्याचे रक्षक भक्षक नाही बनले तर अश्या गोरगरिबांना न्याय मिळतो,समाजात बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नेते आणि प्रामाणिक वकील भेटले तर कोणत्याही मनुवादयाला घाम फोडून न्याय मिळवून घेऊ अशी परिस्थिती आहे. कारण बाबासाहेबांच्या संविधानात न्याय,समानता,बंधुता आणि स्वातंत्र्य व सौर्वभौम आहे,बाळासाहेबांनी सूत्र हातात घेतल्यावर एस आय टी कमिटी बसवली तपासाला गती आली, सर्व नेते आले, भेटले, सोबत आहे असं दाखवलं आणि वापस गेले नंतर कोणी या प्रकरणावर बोललं पण नाही पण आदरणीय बाळासाहेबानी शेवट पर्यंत सोमनाथ सूर्यवंशी च्या नातेवाईकांसोबत राहून, स्वतः एकही रुपया न घेता केस लढवली, सोमनाथ च्या आईने औदर्य दाखवून सरकारी मदत मुख्यामंत्र्या च्या तोंडावर फेकून निषेध केला,पाच लाख रुपये फेटाळून लावले स्पर्श पण केला नाही, धन्य ती माता जिने माझ्या मुलाच्या मारेकरी पोलिसाला फाशी झाली पाहिजे मला न्याय मिळाला पाहिजे असा अट्टाहास केला आणि मला न्याय पाहिजे ह्या भूमिकेत कायम राहिली. आज संबंधित सर्व पोलीस प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी निलंबित करण्याचे मा. हाय कोर्टाचे आदेश आले. सजा सर्वांनाच लागली, धर्माचा मनुवादी माज कायद्याने कायमचा उतरवला गेला.असे जातीयवादी अधिकारी आणि कायद्याचे भक्षक पुन्हा उत्पन्न होणार नाहीत सर्वाना न्याय मिळेल हेच यातून निष्पन्न झालं......#कायदा बा भीमाचा.....जय बाळासाहेब.. जय भीम..... जय संविधान......!*
stay connected