सामाजिक कार्यकर्त नामदेवराव शेळकेंनी वाढदिवसा निमीत्त केले शालेय साहित्याचे वाटप .
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव शेळके यांच्या वाढदिवसा निमीत्त त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांकडे वह्या देत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला . या प्रसंगी माजी सभापती अंकुशराव चव्हाण , माजी सरपंच राजाभाऊ शेळके , प्राचार्य शिवाजी ढोबळे , आजिनाथ शेळके , दादासाहेब उदावंत , फौजी मुनीरभाई , हाजी असलम सर , थोरवे सर , शिक्षक नेते बाळासाहेब शेंदूरकर , स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक संजय काळे , साहेबा चव्हाण , डॉ . वैभव तोडकर , भापकर सर , अरूण दातीर , शंकर गाडे सर , बंडू म्हस्के , आटोळे सर , पत्रकार सय्यद बबलुभाई तसेच आदी ग्रामस्थांनी नामदेवराव शेळके यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . स्तुत्य उपक्रम राबवत शालेय साहित्य वाटप करून नामदेवराव शेळके यांनी आपला वाढदिवस साजरा केला . त्याबद्दल मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या .
stay connected