श्री क्षेत्र अडबंगीनाथ गड कारखेल खुर्द येथे यात्रा उत्सव निमीत्त उद्या कुस्त्यांचा आखाडा
कारखेल प्रतिनिधी / कैलास घुले - आष्टी तालुक्यातील गर्भगिरी पर्वत रांगेच्या कुशीत पवित्र नाथ संप्रदायातील नाथांचा मोठा महिमा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात नाथांचा जलाभिषेक केला जातो. या पावन मुहूर्तावर देशातील विविध ठिकाणांहून कावड धारक पवित्र जल घेऊन येतात यावर्षी श्री क्षेत्र गोरखपुर पशुपतिनाथ मंदिर काठमांडू व प्रभू श्री रामचंद्र आयोध्या येथून कारखेल गावातील दिडशे तरुण मंडळी कावड धारक बनवून प्रभू रामचंद्र आयोध्या येथील पवित्र जलकावड घेऊन पाडव्याच्या मुहूर्तावर कारखेल खुर्द अडबंगीनाथ गडावर जल अभिषेक करण्यात आला आहे. यानिमित्ताने सरस्वती विद्यालय दौलावडगाव येथिल विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, भव्य मिरवणूक आणि जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून कावड धारकांचे जंगी स्वागत ग्रामस्थांकडून करण्यात आले सालाबादप्रमाणे पाडव्याला अडबंगी नाथांची भव्य यात्रा उत्सव मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी जलाभिषेक, रात्री पालखी मिरवणूक, आकाशात फटाक्यांचे आतिषबाजी, गुरुवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. या अभूतपूर्व अशा सोहळ्याला पंचक्रोशीतील नाथ भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज आणि कारखेल खुर्द ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.
कारखेल खुर्द येथे कावड धारकांचे जल्लोषात स्वागत
कारखेल / कैलास घुले
आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द याठिकाणी जागृत दैवत अडबंगीनाथांची यात्रा उत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली.ह.भ.प. बाळकृष्ण महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने यात्रेच्या पहिल्या दिवशी कावड धारकांची जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सरस्वती विद्यालय दौलावडगाव येथिल लेझीम पथकातील विद्यार्थीनींनी मनमोहक सांस्कृतिक नृत्य सादर करून भाविकांची मने जिंकली. या सुंदर अशा सोहळ्याला पंचक्रोशीतील मान्यवर आष्टी पंचायत समिती मा. सभापती श्री अशोक इथापे, दौलावडगाव चे सरपंच श्री भरत जाधव उपसरपंच श्री मा. नंदकुमार फसले, केळ गावचे सरपंच श्री सचिन दळवी, सालेवडगावचे मा. सरपंच श्री महादेव डोके, अंभोरा गावचे सरपंच श्री सागर आमले, अरणविहरा सरपंच श्री आण्णा साहेब शिरसाठ आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. वरील आलेल्या मान्यवरांचे कारखेल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच श्री रघूशेठ घुले यांनी स्वागत केले. यात्रेच्या नियोजनात खारीचा वाटा उचलून उल्लेखनीय रंगत आणल्याबद्दल प्रथम एज्युकेशन सेवाभावी संस्थेचे संमन्वयक श्री प्रदीप बांगर, सरस्वती विद्यालयातील शिक्षक श्री अमोल तांदळे सर, घुले सर, खंडागळे सर, एस. एम. तांदळे, कारभळ सर , , घाटविसावे सर, दत्ता फसले, जालिंदर जपकर, शाळेतील विद्यार्थ्यांनींचा कारखेल ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान व महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने नवनाथ घुले सर यांनी एक पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपसरपंच गहिनीनाथ घूले, मा. सरपंच सचिन घुले, मेजर कुशन घुले, अँड गोविंद घुले, अँड योगेश शेकडे, प्रदीप बांगर, संदिप चोधर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाराजी घुले, नवनाथ महादेव घुले, कैलास मारुती घुले, राजेंद्र मच्छिंद्र घुले, अशोक वनवे, बाबासाहेब गव्हाणे सर, शहादेव सांगळे, बाळासाहेब सर्जेराव घुले, आदी ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पुढील दोन दिवस अनेक चांगले धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक भक्तांनी शांततेत लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच श्री रघूशेठ घुले यांच्या कडून करण्यात आले.
stay connected