जिजाऊ ब्रिगेड विभागीय उपाध्यक्षपदी शिवमती सुवर्णा गिरे यांचे निवड

जिजाऊ ब्रिगेड विभागीय उपाध्यक्षपदी शिवमती सुवर्णा गिरे यांचे निवड 



        आष्टी ( प्रतिनिधी  )

    मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांच्या पुनर्बांधणीसाठी केंद्रीय निवड समितीची बैठक 5 जुलै 2025 रोजी विश्रामगृह बीड येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती प्रमुख शिवश्री  संदिपान जाधव सर हे होते.

       यावेळी बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती सुवर्णा बाळासाहेब गिरे यांच्या कामाची दखल या समितीने घेतली .आणि त्यांची जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड केली आहे. बीड व धाराशिव जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा सर्व तालुक्यामध्ये कार्यान्वित करण्याचा मनोदय या निवडीनंतर गिरेताई यांनी बोलून दाखवला. यापूर्वी त्यांनी आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्षपदही भूषविले आहे . या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

       मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकजी ठाकरे, बीड जिल्हा अध्यक्ष धनंजय शेंडगे, नागनाथ जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष इंजि. तानाजी जंजिरे, लक्ष्मण रेडेकर, ॲड .सीताराम पोकळे, शिवश्री बन्सीधर मोरे ,प्रा. डॉ.दत्तात्रय नरसाळे ,शिरीषभाऊ थोरवे, भास्करराव निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.