आष्टीत शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने सहा दिवस विविध पारंपारिक कार्यक्रमांची मेजवानी
आष्टी प्रतिनिधी
आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ आयोजित शिवशंभो गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक आष्टी यांच्या वतीने यावर्षी आष्टीकरांसाठी या मंडळाच्या वतीने सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाचा आष्टी व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
आष्टी येथे यावर्षी प्रथमच शिवशंभो गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक आष्टी यांच्यावतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बुधवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भव्य भजन स्पर्धेचे आयोजन, गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता टीव्ही फेम युवा संगीत सम्राट शाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोक गाणी पोवाडा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता धनगरी गजे वाद्य परंपरेचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजे ढोल पथकांचा भव्य कार्यक्रम, शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता देशातील प्रसिद्ध मुंबई व कोल्हापूर येथील कवाली सम्राटांचा भव्य मुकाबला होणार आहे तसेच रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता सा रे ग म विजेती महाराष्ट्राची गान कोकिळा कुमारी अंजली व नंदिनी गायकवाड यांचा मराठी हिंदी गीतांचा चांदणे सुरांचे हा सदाबहार कार्यक्रम होणार आहे हे सर्व कार्यक्रमाचे ठिकाण अण्णाभाऊ साठे चौक आंबेडकर उद्यान आष्टी येथे होणार आहेत तरी आष्टी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी व जनतेने या सर्व कार्यक्रमांचा उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected