जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वसुंधरा प्राथमिक विद्यालय अजिंक्य.

 जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वसुंधरा प्राथमिक विद्यालय अजिंक्य.



विकास साळवे आष्टी :- क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सेपाक टकरा मैदानी खेळामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्यामध्ये 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने अजिंक्य पद पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. यामध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथील शिवराज संजय सोले ( कर्णधार) अभय हंबर्डे गजानन सुंबे पार्थ जगताप हर्ष दाते शिवराज शिंदे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला यांना मार्गदर्शन राष्ट्रीय खेळाडू क्रीडा शिक्षक संजय सोले  यांचे लाभले खेळाडू व प्रशिक्षक यांचे कौतुक  जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम युवा नेते सागर आप्पा धस वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मनोज धस साहेब सुरेशं पवार सर  भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखाधिकारी बीड संदिप जोशी सेपाक टकारा असोसिएशन चे अध्यक्ष परवेझ खान सर अन्वर सर प्राध्यापक दिपक टेकाडे प्राचार्य निभोरे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे संपत ढोबळे विकास तात्या साळवे बबनराव करांडे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय मुख्याध्यापक डोके सर गांगडे सर आबादार सर होळकर सर आभिमाने मॅडम शिंदे मॅडम साबळे मॅडम जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक कसरे सर लटपटे सर पोकळे सर कोथिंबीरे सर दादासाहेब साळवे विजय करांडे संतोष आंबा करांडे संतोष नरोडे हरिश्चंद्र करांडे नामदेव जाधव रफिक शेख आदी मान्यवरांनी करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.