*डिजिटल मिडिया परिषदेचा*
*सप्टेंबरमध्ये संभाजीनगरात राज्यव्यापी मेळावा*
मुंबई : डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली..मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे..
अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार राज्यभर झपाट्याने होत आहे.. राज्यातील 30 जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत.. सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.. या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट युट्यूब चॅनल आणि पोर्टल चालविणारया दहा संपादकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.. दोन सत्रात होणारया या मेळाव्यात व्यावसायिक पध्दतीने चँनल कसे चालवावे, त्यातून महसूल कसा उभा करावा, या संबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.. मेळाव्याचे स्थळ आणि अन्य माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील युट्यूब, पोर्टलच्या संपादकांनी मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहनही मिलिंद अष्टीवकर आणि अनिल वाघमारे यांनी केले आहे...
stay connected