होमिओपॅथीक डॉक्टरांचा आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाचा ईशारा,जिल्हाधिकारी यांना निवेदन

 *होमिओपॅथीक डॉक्टरांचा आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाचा ईशारा,जिल्हाधिकारी यांना निवेदन*





            बीड प्रतिनिधी:- दिनांक दहा जुलै 2025 रोजी हिमा होमिओपॅथीक डॉक्टर संघटना आणि सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मा.बीड जिल्हाधिकारी यांना सिसीएमपी डॉक्टरांचे रेजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ला तात्काळ करावे यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीक डॉक्टर आले होते. कोव्हीड सारख्या इमर्जन्सी काळात होमिओपॅथीक डॉक्टरांची सेवा चालते मग महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ला रेजिस्ट्रेशन का चालत नाही? ते तात्काळ करण्याची मागणी या निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी बी, मा. जिल्हाशल्यचिकिस्तक बीड,मा.उपविभागीय अधिकारी बीड आणि मा. तहसीलदार बीड यांना देण्यात आले.यावेळी होमिओपॅथीक कॉन्सिल चे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे, एस के एच कॉलेज चे प्राचार्य डॉ गोशाल, हिमा डॉक्टर संघटना जिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र बंड, महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर, उपाध्यक्ष डॉ वचीष्ट चोले, डॉ. सचिन वारे, डॉ अतिक, डॉ पांगरकर मॅडम, डॉ सोनवणे मॅडम, डॉ जोशी, डॉ बडजाते, डॉ पाबळे, डॉ नासेर, डॉ उबाळे, डॉ गुंजे, डॉ काळे, डॉ खरसाडे, डॉ धट, डॉ काकडे, डॉ साळुंके, डॉ खेत्रे, डॉ कासट, डॉ ठोकरे, डॉ मोरे, डॉ वाघ, डॉ मोहिते, डॉ व्हराट,डॉ उमरजकर,डॉ अनिस, डॉ पाबळे,डॉ गायके, डॉ राऊत, डॉ घेणे,डॉ पाठक, डॉ हटवते,डॉ सदले, डॉ मुळे, डॉ मस्तुद, डॉ शाह, डॉ हांगे, डॉ धुमाळ, डॉ महाजन, डॉ सवासे,डॉ जफर,यांच्यासह जिल्हाभरातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.