आष्टी येथील 132 /33 KV सबस्टेशन येथे सहा कोटीचा 50 MVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर--बाळासाहेब आजबे यांची माहिती

 आष्टी येथील 132 /33 KV सबस्टेशन येथे सहा कोटीचा 50 MVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर--बाळासाहेब आजबे यांची माहिती 



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यातील 132/ 33 KV सब स्टेशन येथे  50 एम व्ही ए चे दोन ट्रान्सफर सध्या सुरू आहेत त्यावर 90 MW चा लोड असूनत्यामुळे  या ठिकाणी 50 MVA चा ट्रांसफार्मर मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यासआज आष्टी येथे  06 कोटी किमतीचा 50 MVA ट्रांसफार्मरलाआज राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याची  माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी दिली         

            याबाबत पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे  म्हणाले की आष्टी तालुक्यात 132/33 KV हे उच्च दाबाचे सबस्टेशन आहे परंतु त्यामध्ये 90 एम डब्ल्यू चा लोड असल्याने शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागत होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागनीनुसार आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब   यांच्याकडे आष्टी या ठिकाणी 50 एम व्ही ए चा ट्रांसफार्मर मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यास आज ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी  प्रशासकीय मंजुरी देत आष्टी या ठिकाणी सहा कोटी रुपये किमतीचा 50 MVA चा ट्रांसफार्मर मंजूर केला आहे त्यामुळे आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वीज टंचाई कमी होऊन उच्च दाबाने शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे , येणाऱ्या काळातील विजेता प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले आष्टी येथील  132/ 33 या सबस्टेशन वर आठ फिडर असून 20 सबस्टेशन आहेत या सर्व सबस्टेशन मधून कमी दाबाने शेतीपंपासाठी वीजपुरवठा होत होता अशी ओरड गेल्या दोन वर्षापासून शेतकरी वर्गातून केली जात होती या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आष्टी येथे सहा कोटी किंमतीचा  नवीन 50 एम व्ही ए चा ट्रांसफार्मर मंजूर करून घेतला आहे या मंजुरी बाबत आमदार या नात्याने मी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त  करतो असे  आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.