*भिवंडीत नववर्षाचे जोरदार स्वागत करीत कवी संमेलनाद्वारे प्रबोधनात्मक वैचारिक विचारांचा अनोखा जोरदार जल्लोष*
*बौद्ध साहित्य प्रसार -प्रचार संस्थेच्या महाराष्ट्र कार्यकारणी मार्फत कवी संमेलन संपन्न*
( प्रतिनिधी )
भिवंडी / ठाणे
बौद्ध साहित्य प्रसार-प्रचार संस्था महाराष्ट्र कार्यकारणीचे अध्यक्ष कवी भटू जगदेव यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमनी बौद्ध विहार, भिवंडी येथे कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते महामानवांना पुष्प - पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. वंदना घेऊन कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. बौद्ध साहित्य प्रसार प्रचार संस्थेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कवी नवनाथ रणखांबे यांनी आम्ही बौद्ध साहित्याचे संवर्धन , प्रसार आणि प्रचार करीत असून वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी वर्षे , भीमा कोरेगाव शौर्य दिन, आणि नूतन वर्षाचे औचित्य साधून वैचारिक विचारांची पेरणी करण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी बौद्ध साहित्य प्रसार प्रचार संस्थेचे महाराष्ट्र कार्यकारणीचे आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी भटू जगदेव , बौद्ध साहित्य प्रसार प्रचार संस्थेचे महाराष्ट्र कार्यकारणीचे कार्याध्यक्ष गजलकार नवनाथ रणखांबे, प्रदेश कार्यकारणी संघटक कवी वसंत हिरे, कोकण विभाग अध्यक्ष गजलकार नरेश जाधव , शाहीर मास्टर राजरत्न राजगुरू, गजलकार विजयकुमार भोईर, कवी संदीप कांबळे, कवी उदय क्षीरसागर, कवी अक्षय भोईर , कवी भगवान गायकवाड आदी कवींच्या कवितेने नववर्षाचे जोरदार स्वागत करीत प्रबोधनात्मक वैचारिक विचारांचा जोरदार जल्लोष भिवंडी शहरात करण्यात आला.
stay connected