चैतन्यानंद स्वामी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू
देवळाली(अतुल जवणे) -आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबाद प्रमाणे प.पू.ब्र.भू.सदगुरू श्री स्वामी चैतन्यानंद महाराज यांच्या ५२वा पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात सुरू होणार असून दि. १०जानेवारी ते दि.१७ जानेवारी या कालावधीत तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प.पू.ब्र.भू .सदगुरू श्री. चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा मंगळवार दि.१०जाने रोजी मोठ्या उत्साहात सुरु होत आहे दि १० रोजी सकाळी ९वा प.पू .स्वामींची प्रतिमा ,ग्रंथ आणि रामायण कथा प्रवक्ते धर्माचार्य ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांची भव्य मिरवणूक निघेल नंतर संत महंत व मान्यवरांच्या हस्ते वीणापूजन होऊन पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ होणार आहे दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ९ते१२व दुपारी २ते५ या वेळेत तुलसी रामायण कथा धर्माचार्य ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांच्या रसाळ वाणीतून संपन्न होणार आहे दि.१०जाने रोजी रात्री ८ते१० या वेळेत ह.भ.प.श्री.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे हरिकीर्तन होईल बुधवार दि.११जाने रोजी रात्री ८ते१०ह.भ.प.आरतीताई शिंदे महाराज यांचे हरिकीर्तन होईल गुरूवार दि.१२जाने रोजी रात्री ८ ते१० ह.भ.प.हरिदास महाराज पालवे शास्री यांचे हरिकीर्तन होईल,शुक्रवार दि.१३ जाने रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.श्री तुकाराम महाराज मुंढे यांचे हरिकीर्तन होईल,शनिवार दि.१४जाने रोजी रात्री ८ते१० ह.भ.प.प्रज्ञाचक्षू ह.भ.प.मुकुंद काका जाटदेवळेकर यांचे हरिकीर्तन होईल रविवार दि.१५जाने रोजी रात्री ८ ते १०ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन होईल सोमवार दि.१६जाने रोजी रात्री ८ ते १०ह.भ.प.शिवलिलाताई पाटील महाराज यांचे हरिकीर्तन होईल मंगळवार दि.१७जानेवारी रोजी सकाळी ९ ते११ धर्माचार्य ह.भ.प.श्री शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक निघेल या मिरवणूकीमध्ये चैतन्य स्वामी भजनी मंडळ तसेच पुणे येथिल ढोल पथक,विविध शाळेचे लेझीम पथक सहभागी होणार आहेत मिरवणूकी नंतर महाप्रसाद होईल या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक संत महंत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहास उपस्थित राहून तुलसी रामायण कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी देवळाली ग्रामस्थांची नम्र विनंती आहे.
stay connected