३२ वर्षांच्या ज्ञानदानाच्या प्रवासाला मानाचा मुजरा! प्राचार्य सय्यद आयुब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता वसतीगृह शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालय व माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद आयुब यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Vdo news📽️👇
कार्यक्रमाचे सविस्तर VDO वृत्त पहा👆
यावेळी आमदार सुरेश धस यांनी आयुब सरांच्या अध्यापनकलेचे कौतुक करत इंग्रजीसारखा विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी अद्भुत असल्याचे म्हटले. ३२ वर्षे ज्ञानदानाची सेवा बजावणारे आयुब सर निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यातून तरुणांना दिशा देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून रोजगार आणि उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन केले. आयुब सरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत समाजासाठी कार्यरत राहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने जपावा, आई-वडिलांची सेवा करावी आणि मुलांवर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन केले. तर देवीदास आबा धस यांनी आयुब सरांच्या उत्कृष्ट सेवाकार्याचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना सय्यद आयुब सरांनी शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून संस्कारक्षम पिढी घडविणारा असतो, असे भावपूर्ण विचार मांडले. शिक्षक बिघडला तर पिढी बिघडते, असे सांगत विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या यशामागे मित्रपरिवार, सहकारी आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन असल्याचे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी विद्यार्थिनी जान्हवी पायमोडे हिने आपल्या भाषणातून आयुब सरांनी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर भावना व्यक्त करण्यासाठी शब्द आणि आत्मविश्वास दिला, अशा भावना व्यक्त करत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अनेक सहकारी, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांनी आयुब सरांच्या शिस्तप्रिय, प्रभावी अध्यापनशैली व विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास आ. सुरेश धस, विजयकुमार बांदल, माजी प्राचार्य गव्हाणे सर, सरपंच सविता शेळके, उपसरपंच मनिषा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पवार, प्रा. आटोळे व पठाण सर यांनी केले, तर आभार काकडे सर यांनी मानले.
३२ वर्षांची सेवा संपली, मात्र ज्ञानदानातून घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आयुब सरांचे स्थान कायम राहणार…! त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याने शिक्षक हा समाज आणि पिढी घडविणारा खरा शिल्पकार असल्याची भावना पुन्हा अधोरेखित झाली.
या सोहळ्यास आमदार सुरेश धस, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार बांदल, सय्यद अब्दुलभाई, माजी प्राचार्य गव्हाणे सर, सरपंच सौ. सविता सुभाष शेळके, उपसरपंच मनिषा गायकवाड, ॲड. ताहेर साहेब, परमेश्वर काका शेळके, अंकुशराव चव्हाण, जावेद पठाण, राजाभाऊ शेळके, सुभाष शेळके, हभप गायकवाड, विक्रम पोकळे, राजु मास्टर, डॉ. रज्जाक सय्यद, राम नाना शेळके, केशव चव्हाण, दादासाहेब गव्हाणे , कैलास मोरे , अनिल ढोबळे , सोमनाथ लगड, महादेव अडागळे, आजिनाथ शेळके, फारूख भाई, नामदेव शेळके, राजु गव्हाणे, राहुल शेळके, सलीमभाई शेख, उत्तम गव्हाणे, गवळी सर, शिवाजी ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवार, प्रा. आटोळे आणि पठाण सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन काकडे सर यांनी मानले.






stay connected