डॉ हरिदास विधाते यांचा राष्ट्रीय गौरव पुण्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान

 

डॉ. हरिदास विधाते यांचा राष्ट्रीय गौरव
पुण्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान



कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार संघ सभागृहात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अभिनेत्री अक्षता खरटमोल, गणेश विकटर सह मान्यवरांच्या हस्ते डॉ. विधाते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. मंगल हरिदास विधाते यांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या शैक्षणिक प्रयत्न, महाविद्यालयीन उपक्रमांतील योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग या कार्याची दखल घेत डॉ. विधाते यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनकडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारामुळे कडा येथील महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील डॉ. विधाते यांच्या कार्याची राज्याबाहेरील व्यासपीठावरही नोंद झाली आहे. शैक्षणिक जबाबदारीसोबत सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

तेजवार्ता
संपादक सय्यद बबलूभाई
8888347033
RNI No MAHMAR/2014/59337
वर्ष 23 वे शुक्रवार दि .25 सप्टेबर 2026

पेपर डिजाईन बनवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर