मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा बैठकीस शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे : प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)

 *मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा बैठकीस शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे : प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)* 



बीड: दि.(महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.) मुप्टा,शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली  व जिल्हाध्यक्ष मा.शरदराव मगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बैठकीचे आयोजन व्यापक स्वरूपात करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यातील 'मुप्टा' शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, दि.२८ नोव्हेंबर २०२६ शनिवार रोजी बीड मधील 'निलकमल हॉटेल' येथे संध्याकाळी ठीक ०६:०० वाजता.मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक व नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश आयोजित करण्यात आला आहे.या बैठकीस मुप्टाचे नेते मा.प्रा.सुनील (भाऊ) मगरे सर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या बैठकीस प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय अध्यक्ष डॉ.संभाजी वाघमारे, मुप्टा उर्दू राज्याध्यक्ष मा.असिफ सर, मुप्टा विभागीय कार्याध्यक्ष डॉ. भास्कर टेकाळे, तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रा.प्रदीप रोडे उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या वतीने खालील प्रमुख विषयावर चर्चा व निर्णय होणार आहेत.

 *प्रमुख मागण्या:* 

१)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात.

२) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार ३० विद्यार्थ्या ऐवजी प्रति २० विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी.

३) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत.

४) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 

५) ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत.

६) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा.

७) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाईन करणे.आदी  

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा.शशिकांत जावळे, जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे,ज्युनियर विभाग जिल्हाध्यक्ष प्रा.नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष मा.प्रवीणकुमार तरकसे, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, डॉ.शंकर वाघमारे, डॉ.मनोहर शिरसाट, प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत, आदी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर