अण्णा हजारे यांची शेतकरी संरक्षण कायदा संदर्भात सखोल विधायक चर्चा

 

अण्णा हजारे यांची शेतकरी संरक्षण कायदा संदर्भात सखोल विधायक चर्चा



राळेगण सिद्धी येथे दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी पद्मविभूषण माननीय अण्णा हजारे यांच्या समवेत माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे, प्रदेशाध्यक्ष अशोकराव सब्बन, ज्येष्ठ भ्रष्टाचार विरोधी नेते रामराव पाटील भदगले व नेवासा तालुका उपाध्यक्ष कल्याणराव मुरूमकर यांनी**शेतकरी संरक्षण कायदा मसुदा 2026**यावर अभ्यासपूर्ण चर्चा केली. सन्मा. अण्णा हजारे यांनी विवेचन करताना प्रतिपादित केले की शेतकरी संरक्षण कायदा ही काळाची गरज आहे, कारण सध्या शेतकरी खूप मोठ्या संकटातून शेती करत आहे. प्रदेशाध्यक्ष , सब्बन यांनी शेतकऱ्याच्या पूर्वमशागती व पेरणी पासून थेट पीक कापणी पर्यंत सर्व घटकांचा विचार करून*शेतकरी संरक्षण कायदा 2026 चा**मसुदा तयार करण्यात आला आहे. डॉक्टर ढगे म्हणाले की जगातील प्रगत देशात शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उत्तम प्रतीचे कायदे आहेत अमेरिकेत इरमा, इजराइल मध्ये ॲग्रोस्को तसेच इतर राष्ट्रात शेतकऱ्यांना संरक्षण दिले जाते. शेतकऱ्यांना सर्पदंश, जंगली डुक्कर व बिबट्यांपासून मृत्यू, ढगफुटी ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या महान संकटातून संवर्धन करणे व त्या अनुषंगाने संरक्षण कायदा असला पाहिजे. शेतकरी संरक्षण कायद्याच्या मसुद्याची प्रत कल्याणराव मुरूमकर व रामराव पाटील यांच्या हस्ते अण्णांकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी माननीय अण्णांकडे अशी अपेक्षा केली की सदरचा मसुदा राज्याचा कायदा म्हणून आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घ्यावा. हा मसुदा अभ्यासपूर्ण असल्याचे अण्णा हजारे यांनी अभिप्राय देऊन आपण माननीय मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात तातडीने विनंती करू. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे लिखित,**कृषी तरंग**पुस्तकाची प्रत हजारे यांना सस्नेह सविनय सादर करण्यात आली. प्रदीर्घ सविस्तर अभ्यास पूर्ण चर्चेनंतर सोनू भैय्या पवार यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले. माननीय अण्णांचे सहाय्यक अन्सार शेख यांनी आपण या संदर्भात कार्यवाही बाबत दखल घेण्यासंबंधी जबाबदारी स्वीकारली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर