नवरात्र उत्सवानिमित्त साबलखेड येथील रेणुका माता मंदिराच्या इतिहासात प्रथमच कडा येथील दुर्गा माता ग्रुपच्या महिलांनी केले दुर्गा सप्तशती पाठ

 नवरात्र उत्सवानिमित्त साबलखेड येथील रेणुका माता मंदिराच्या इतिहासात प्रथमच कडा येथील दुर्गा माता ग्रुपच्या महिलांनी केले दुर्गा सप्तशती पाठ  





कडा ( वार्ताहर ) :-  आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त साबलखेड  मंदिराच्या इतिहासात प्रथमच कडा येथील दुर्गा माता ग्रुपच्या महिलांनी दुर्गा सप्तशती पाठ व कुमकुम अर्चम कार्यक्रम उत्साहात केला. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, नवरात्र उत्सव म्हणजे महिलांसाठी ऊर्जा, बळ, शक्ती, ताकद मिळण्याचा एक पवित्र उत्सव मानला जातो. नवरात्रामध्ये महिला नऊ दिवस  उपवास करतात. वेगवेगळ्या ठिकाणी देवीच्या मंदिरात जाऊन पाठ पूजाअर्चा करतात.


 कडा येथील ज्ञानदीप काॅलनीमधील दुर्गा माता ग्रुपच्या 

‌सौ. शितल सोनवणे,सौ. निता भवर,सौ. समृद्धी भोजने, सौ. अर्चना पोकळे,सौ. राणी झांजे 

सौ. शोभा बोडखे,कु. अनुष्का बोडखे,सौ. संगीता भुजबळ, सौ. विद्या शिंदे, सौ. सुवर्णा झगडे यांनी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 

साबलखेड येथील रेणुका माता मंदिरात जाऊन दुर्गा सप्तशती पाठ व कुमकुम अर्चम कार्यक्रम उत्साहात केला.


     दुर्गा सप्तशती पाठ हा नवरात्रीच्या काळात केला जाणारा अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नऊ दिवसांत 'दुर्गा सप्तशती'चा पाठ करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व मानले जाते.

  दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्तंड पुराण किंवा श्रीदुर्गासप्तशती म्हणून ओळखला जातो. यात देवी दुर्गेच्या महात्म्याचे वर्णन करणारे एकूण ७०० श्लोक आहेत (म्हणूनच याला 'सप्तशती' म्हणजेच सातशे श्लोक असलेला ग्रंथ म्हणतात).या ग्रंथात मुख्यत्वे १३ अध्याय आहेत. नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व म्हणजे ऊर्जा आणि संरक्षण होय. 




नवरात्रीचे नऊ दिवस सृष्टीत सात्त्विक आणि दैवी ऊर्जेचा प्रवाह वाढलेला असतो. या काळात पाठ केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. प्रत्येक अध्याय जीवनातील वेगवेगळी संकटे, भीती, शत्रूबाधा, दारिद्र्य आणि रोगराई दूर करण्यासाठी मानला मानला जातो.हा पाठ साधारणपणे घटस्थापनेपासून (पहिल्या माळेपासून) नवमीपर्यंत केला जातो. पाठासाठी लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दुर्गा सप्तशतीचे पुस्तक ठेवावे आणि कुंकू, अक्षता, फुले व दिवा लावून पूजा करावी. श्रद्धा आणि भक्तीभावाने केलेला हा पाठ माणसाला मानसिक बळ आणि यश मिळवून देतो.कुमकुम अर्चन हा हिंदू धर्मातील देवीच्या उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि फलदायी विधी आहे. यात देवीच्या (विशेषतः माता लक्ष्मी, देवी दुर्गा किंवा ललिता त्रिपुरसुंदरी यांच्या) सहस्रनावांचा (१००० नावांचा) किंवा अष्टोत्तरशतनामांचा (१०८ नावांचा) जप करत प्रत्येक नावाच्या उच्चारानंतर देवीच्या चरणी किंवा मूर्तीवर कुंकू अर्पण केले जाते. हा विधी प्रामुख्याने स्त्रीशक्तीच्या (देवीच्या) उपासनेशी जोडलेला असून तो अत्यंत पवित्र आणि शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो.

     कडा येथील ज्ञानदीप काॅलनीमधील दुर्गा माता ग्रुपच्या महिलांनी  या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ व कुमकुम अर्चम कार्यक्रम केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर