*स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था.. राज्यस्तरीय आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन करिता.. कथालेखक बाळासाहेब देशमुख निमंत्रित*
अहिल्यानगर:- स्व पै किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा, निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.. राज्यस्तरीय ०८वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, निमगाव वाघा येथे १० सप्टेंबर 2026 रोजी संपन्न होत आहे. साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक शंकर अंदानी यांची निवड झालेली आहे. कवी संमेलन अध्यक्ष म्हणून जेष्ठ कविवर्य रूपचंद शिदोरे यांची निवड झालेली आहे.
साहित्य संमेलन आयोजक माननीय नाना डोंगरे यांनी पत्र पाठवून, कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन कार्यक्रमाकरिता निमंत्रित केलेले आहे.
कथालेखक बाळासाहेब देशमुख, कथाकथन कार्यक्रमात 'दुर्गा मावशी ' ही कथा सांगणार आहेत. जुन्या जमान्यातली दूर्गा मावशी. शिक्षण कमी, जीवनानुभव जास्त. साध्या साध्या गोष्टीतही सर्वांना बोधामृत देणारी. माणुसकीचा गहिवर जागवणारी. एका हाताने केलेला दानधर्म ,दुसऱ्या हाताला कळणार नाही. अशी दक्षता घेणारी. रसिक प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.
बाळासाहेब देशमुखांचे कथाकथन आजवर अहिल्यानगर जिल्ह्यात 500 प्रयोग पूर्ण झालेले आहेत. शिवाय विविध आकाशवाणी केंद्रावर 120 कथा प्रसारित झालेल्या आहेत. राज्यस्तरीय साहित्य संमेलन मध्ये त्यांचे आजवर ३२ कथाकथन प्रयोग पूर्ण झालेले आहेत.. रंग माझा वेगळा, माणसे अशी.. अन् तशीही... , माणसं भिंगातून... हे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
त्यांचा चौथा कथासंग्रह 'मोसाईक' लवकरच प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, बाबुराव उपाध्ये , शशिकांत शिंदे , दादासाहेब कोते ,दिलीप कापसे, डॉ बाळासाहेब कोठुळे यांनी अभिनंदन केले आहे..
साहित्यिक, कवी यांनी 10 सप्टेंबर 26 रोजी संमेलना करता,आवर्जून येण्याचे आवाहन, आयोजक श्री नानासाहेब डोंगरे यांनी केलेले आहे.


stay connected