कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय ढोबळे व उप सभापती रामदास शेंडगे यांचा आ. सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार
आष्टी : प्रतिनिधी
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय ढोबळे आणि उपसभापतीपदी रामदास शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आष्टी येथील अद्वैतचंद्र निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती रमजान तांबोळी यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल आमदार धस यांनी त्यांचे कौतुक केले.
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था असून, शेतमालाला योग्य बाजारपेठ व चांगला भाव मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शेतकरी बांधवांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत बाजार समितीच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींकडून उल्लेखनीय कार्य घडावे, अशी अपेक्षा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल समर्थक, बाजार समितीचे संचालक व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कडा बाजार समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी यावेळी मावळते सभापती रमजान तांबोळी, सचिव हनुमंत गळगटे,नामदेव धोंडे, अशोक पवार, बाबासाहेब शेकडे, राजेंद्र गव्हाणे, मधुकर सायंबर, मुरलीधर फसले, आबा तळेकर, अशोक लगड,परिवंत गायकवाड, राम मधुरकर, संजय मेहेर, संदीप नागरगोजे,अण्णासाहेब लांबडे राजू हुलगे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


stay connected