श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे नामदार विखे पाटील संदर्भीय विधान गैर व अनावश्यक - डॉक्टर अशोकराव ढगे

 श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे नामदार विखे पाटील संदर्भीय विधान गैर व अनावश्यक - डॉक्टर अशोकराव ढगे



आपल्या भारतीय घटनेमध्ये अनेक चांगली मूलभूत हक्क दिले आहेत. त्यानुसार आंदोलनाचे प्रभावी हत्यार महात्मा गांधी पासून अनेकांनी आत्तापर्यंत वापरले व त्याचा सदुपयोग केला आहे. श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे आंदोलन विशेषतः उपोषण सुरू आहे त्यांची मराठा समाजाविषयीची तळमळ निश्चितच उच्च कोटीची आहे कारण स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात मराठ्यांच्या साठी आरक्षण हा विषय गेल्या दोन दशकापासून सुरू झाला आहे यापूर्वी मराठ्यांनी काहीही मागितले नव्हते असे असले तरी श्री जरांगे पाटील यांनी सरकारमधील विविध मंत्री यांच्या संदर्भात विधाने करताना मर्यादा ठेवली पाहिजे आंदोलनात वाटाघाटी असतातच. त्या अनुषंगाने विचारमंथन चर्चा व समाज जागृती प्रक्रिया सुरू असतात. आंदोलनाचा शास्त्रीय अभ्यास करता त्यामध्ये काही टप्पे असतात त्यानुसार आंदोलनाची वाटचाल होत असते व यश पदरात पडते . समाजाची हित करत असताना सरकारकडून काही मागण्या पदरात पडून घेणे व पुढील टप्प्यासाठी तयारी करणे हा महत्त्वाचा भाग असतो हे करत असताना लोकशाहीमध्ये ज्येष्ठ व्यक्तींविषयी बोलताना सन्मान राखला पाहिजे श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील संदर्भीय विधान गैर व अनावश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मागण्या मान्य झाल्या पाहिजेत तथापि वैचारिक मंथन समाज प्रबोधन ही लोकशाहीतील महत्त्वाची अंगे विचारात घेऊन पुढे जावे अशी अपेक्षा डॉ ढगे यांनी केली आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर