आष्टी | प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित तानूबाई बिरजे पत्रकार परिषद, आष्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह, जामखेड रोड, आष्टी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे , उद्योजक एन बी धुमाळ , मा कार्य संचालक आर जे पवार , संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शशिकांत कन्हेरे , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तान्हाजी जंजीरे , प्रल्हाद तळेकर , सिताराम पोकळे , दादा पवळ आदी मान्यवर उपस्थित होते . सुत्र संचलन लाड सर यांनी केले .
समाजसेवा, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, महिला सक्षमीकरण, अध्यात्म, संगीत आदी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त मान्यवर
डॉ. विलास सोनवणे (आदर्श डॉक्टर), सुखदेव पोकळे (दिव्यांग संस्था चालक), संजय शिंगावी (मेडिकल व्यावसायिक), संदीप पाचरणे (साहित्यिक), अमर वालके (रुग्णसेवक), जालिंदर पोकळे (कोविड योद्धा), अंबिका शिंगे (आशा वर्कर), ॲड. सायली चौधरी (निवेदिका), संदीप जाधव (पत्रकार), अविशांत कुमकर (पत्रकार), राजेंद्र जैन (पत्रकार), सय्यद बबलु भाई (पत्रकार), आदर्श सरपंच राधेश्याम धस. , प्रा. मधुकर दहातोंडे (मराठा सेवक), प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे (मराठा सेवक), इंजि. सागर आमले (मराठा सेवक), सुनील रेडेकर (मराठा सेवक), अशोक (आण्णा) पोकळे (मराठा सेवक), साईनाथ पोकळे (मराठा सेवक), गणेश पोकळे (मराठा सेवक), प्राचार्य सोपानराव निंबोरे (उच्च शिक्षण), नारायण तरसाळे (प्राथमिक शिक्षण), विक्रांत हिंगे (पोलीस सेवा), प्रतिभा थोरवे (सरपंच), महंत काशिनाथ महाराज शास्त्री (अध्यात्म), अनिल (तात्या) ढोबळे (समाजसेवक), सय्यद एकबाल पेंटर (समाजसेवक), सावळेराम बळे (समाजसेवक), ह.भ.प. राजेंद्र लोखंडे (समाजसेवक), सुनील नाथ (समाजसेवक), आम्रपाली साबळे (समाजसेविका), अंकुश जगताप (समाजसेवक), संपूर्णा सावंत (समाजसेविका), शोभा भालसिंग (समाजसेविका), अर्चना पाटील (प्राथमिक शिक्षण), प्रा. डॉ. म्हातारदेव म्हस्के (शिक्षण), प्रा. स्वाती चौधरी (शिक्षण), ॲड. अनुराधा येवले (वकीली), आशा मोरजकर (शिक्षण संस्था चालक), सीमा काटकर (महिला उद्योग), जे. आर. पवार (प्रशासन), विभावरी ताकट (महिला सक्षमीकरण), सुरेश खोसे (संपादक), गौतम खंडागळे, एम. एम. शेख, आकाश जाधव, अनिल बैरागे, प्रियंका भंडारी, अस्मिता सुरवसे, निशा उजगरे व ललिता लांडगे (संगीत) यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तानूबाई बिरजे पत्रकार परिषद व मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


stay connected