प्रसिद्ध संशोधक डॉ. संकेत रमाकांत लोढा यांना पीएच.डी. पदवी; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
पुणे | प्रतिनिधी
शैक्षणिक, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देणारे डॉ. संकेत रमाकांत लोढा यांना एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी Management Science विषयातील Doctor of Philosophy (Ph.D.) पदवी प्रदान केली आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार त्यांचा प्रबंध "Analysis of Marketing Based on Customer Segmentation Using Machine Learning" हा यशस्वीरीत्या मंजूर झाला असून त्यांना पीएच.डी. पदवीसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे. त्यांची पीएच.डी. व्हायवा-व्होसे परीक्षा 31 जुलै 2026 रोजी पार पडली.
या संशोधन प्रबंधाचे मूल्यमापन देशातील National Forensic Sciences University (NFSU), गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेतील तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात आले. IIT मधील Dr. Chaudhary यांनीही स्वतंत्रपणे प्रबंधाचे परीक्षण केले.
डॉ. लोढा हे सध्या १३ वर्षांहून अधिक अध्यापन व औद्योगिक अनुभव आहे. ते ATAL Faculty Development Programme मध्ये तज्ज्ञ वक्ते म्हणून मार्गदर्शन करतात तसेच Google Developer Groups मध्ये Faculty Adviser म्हणूनही कार्यरत आहेत.
संशोधन क्षेत्रात त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही उल्लेखनीय ओळख निर्माण झाली आहे. ते European Journal of Computer Sciences and Informatics, European Journal of Scientific Research and Reviews, Journal of Advanced Veterinary and Animal Research यांसारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे Reviewer आहेत. तसेच CompSci & AI Advances (Columbus, Ohio, USA) या नियतकालिकाचे International Editor आणि Australian Business Deans Council (ABDC) मान्यताप्राप्त Empirical Economics Letters या नियतकालिकाचे Guest Editor म्हणून कार्यरत आहे. याशिवाय ते IEEE Conference Reviewer म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या संशोधन कार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांच्या दोन संशोधन लेखांची NASA, Smithsonian Institution आणि Harvard ADS डेटाबेसमध्ये अनुक्रमणिका (Indexing) झाली असून त्यांचे अनेक संशोधन लेख Scopus आणि IEEE Xplore मध्येही प्रकाशित झाले आहेत.
डॉ. लोढा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, डिजिटल मार्केटिंग आणि आरोग्य तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर अनेक संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संशोधनाचा समावेश IEEE, Springer, Scopus तसेच इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये झाला आहे.
शैक्षणिक लेखन क्षेत्रात त्यांनी अनेक पुस्तके व पुस्तक प्रकरणांचे (Book Chapters) लेखन केले असून Python, Data Science, Artificial Intelligence, Cloud Computing आणि Algorithm या विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
बौद्धिक संपदा (Intellectual Property) क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. AI आधारित प्रणाली, Customer Segmentation, Recycling Bin, IoT आधारित उपकरणे, आरोग्यविषयक तंत्रज्ञान आदी विषयांवरील अनेक डिझाईन पेटंट, युटिलिटी पेटंट आणि कॉपीराइट्स त्यांच्या नावावर आहेत.
डॉ. लोढा यांना मिळालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश होतो:
• Best Teacher State Level (Rajyasthariy Shikshak Ratna) Award – 2024
• National Environment Warrior Award – 2024
• Vishwa Intellectual Property Right Research Excellence Award – 2024
• Research Excellence Award – 2024
• Vidyabhushan Puraskar – 2025
याशिवाय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Paper Setter, Chairman, External Examiner, Session Chair, Judge, Resource Person आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील तज्ज्ञ वक्ते म्हणूनही योगदान देत आहेत.
डॉ. संकेत रमाकांत लोढा यांची पीएच.डी. पदवी, राष्ट्रीय स्तरावरील प्रबंध मूल्यांकन, आंतरराष्ट्रीय संशोधन, संपादकीय जबाबदाऱ्या, पेटंट्स, पुस्तके, संशोधन लेख आणि पुरस्कार यामुळे महाराष्ट्रासह देशातील संशोधन व उच्च शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव विशेष उल्लेखनीय ठरत आहे.


stay connected