Abacus अबॅकसमुळे घडते बुद्धिमान पिढी; आमदार सुरेश (आण्णा) धस यांचे प्रतिपादन Suresh Dhas

 *अबॅकसमुळे घडते बुद्धिमान पिढी; आमदार सुरेश (आण्णा) धस यांचे प्रतिपादन*

Tejvarta

अबॅकसमुळे घडते बुद्धिमान पिढी; आमदार सुरेश (आण्णा) धस यांचे प्रतिपादन


इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील ७१७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग • चॅम्पियन विद्यार्थ्यांचा धनादेश, स्मार्ट वॉच व ट्रॉफी देऊन गौरव


जामखेड (प्रतिनिधी) : इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी, पुणे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा व भव्य पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी साईबन मंगल कार्यालय, कर्जत रोड, जामखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत देशभरातील ७१७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या बौद्धिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके व सचिव दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Mukhyamantri maha arogya shibir


स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत मोठमोठी गणिते अचूक व वेगाने सोडवून उपस्थितांना अचंबित केले. झटपट गणित सोडविण्याच्या त्यांच्या कौशल्याने उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश (आण्णा) धस होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी, जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, कृषी अधिकारी शीतल पाचारणे, भाजप नेते मधुकर (आबा) राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्राचार्य गौतम केळकर, प्राचार्या धनश्री उगले, सरपंच सागरभाऊ कोल्हे, केंद्रप्रमुख नितीन कर्डुळे, प्राचार्या मनीषा काळदाते, पर्यवेक्षक सुदाम वराट, उद्योजक केतनशेठ भंडारी, लेखापरीक्षक बबन मोरे, उद्योजक अशोक चोरडिया, मंडळ अधिकारी पखाले साहेब, दीपक सोले, नामदेव पाटील वाळके, साक्षी काळदाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


अध्यक्षीय भाषणात आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी लहान वयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “अबॅकस पद्धतीने शिक्षण घेतल्याने मुलांची एकाग्रता, अचूकता व आत्मविश्वास वाढतो. अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून भविष्यात बुद्धिमान पिढी घडविण्यात त्याचा मोठा वाटा आहे.” तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना “जगातील एकमेव राजा ज्यांचा जयघोष केला की अंगावर शहारे येतात,” असे गौरवोद्गार काढत उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळविला. देशभरातील विद्यार्थ्यांना अबॅकस व वैदिक गणिताचे शिक्षण देणाऱ्या इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अबॅकसमुळे गणित विषय अधिक सोपा व आनंददायी बनतो. ज्यांना यावेळी पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता “इस बार नहीं तो अगली बार सही” हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिक मेहनत घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.


विशेष उपस्थित असलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना “यश मिळाले म्हणून थांबू नका आणि अपयश आले म्हणून खचून जाऊ नका,” असा प्रेरणादायी संदेश दिला.


राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या राजवर्धन बडे व श्रावणी राख यांना प्रत्येकी ₹३,००० चा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच श्रावणी गोंदकर, पृथ्वीराज सोले व यशश्री माकणे यांना स्मार्ट वॉच प्रदान करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शौर्य मोराळे, दर्शन झगडे, प्रांजली भोकारे, यशराज पारखे, समर्थ धोंडे, तन्वी झगडे, स्नेहा आंधळे, रुद्र कापसे, कार्तिकी जाधवर, विराज कुटे, मयुरी गर्जे, अर्णव क्षिरसागर, रुद्र सोले, साई थोरवे, साई पोकळे, वैष्णवी तांदळे, विराज भोरे, शिवेंद्र शिंदे, आर्या गायकवाड, यशराज जरे, संस्कृती गदादे, वैष्णवी भवर, जिवेंद्र गव्हाणे, साई मोठे, भक्ती मिसाळ, प्रथमेश धोंडे, निशांत भोसले, सिद्धी काळदाते, कात्ययानी आजबे आणि सृष्टी गायकवाड या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.



अकॅडमीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अश्विनी कोल्हे यांना स्टार टीचर अवॉर्ड, तर अनिता थोरवे, प्राजक्ता मातणे आणि सुजाता नागतिलक यांना बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक नामदेव रकटाटे, रविंद्र रकटाटे, निळकंठ रकटाटे, श्रीतेज रकटाटे तसेच सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.


प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीच्या कार्याची व राष्ट्रीय स्पर्धेची माहिती दिली. सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर