शाळकरी मुलीला दवाखान्यात दाखल करताच पालक हादरले ! नेमकं काय घडलं ?
आष्टी ( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोटात दुखतं असं 15 वर्षीय मुलीने आई वडिलांना सांगितलं. त्यानंतर मुली रुग्णालयात जे सत्य समोर आलं त्यामुळे आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.बीड च्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षीय शाळकरी मुलीच्या पोटात दुखत होतं. तिने आई वडिलांना त्याबद्दल सांगितलं. तिच्या पोटातील वेदना वाढल्या आणि तिची प्रकृती खराब झाली. म्हणून आई वडील लेकीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टराने मुलीची तपासणी केल्यावर ती प्रेग्नेंट असल्याचे समोर आलं. धक्कादायक म्हणजे काही वेळातच तिने एका बाळाला जन्मही दिला. या घटनेमुळे पालकांसोबत डॉक्टरांना धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केल्यावर भयानक कृत्य समोर आलं. या घटनेनंतर बीडमध्ये खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
पोलीस सूत्रांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, ही पीडित मुलगी बीड अहिल्यानगर महामार्गाजवळ असलेल्या एका शाळेत शिकत होती. तिच्यासोबत वर्षाभरापूर्वी क्रूर कृत्य घडलं. ती शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात नराधमाने तिला गावत सोडतो असं सांगून गाडीतून लिफ्ट दिली. त्यानंतर त्या नराधमाने तिचे डोळे बांधले. त्यानंतर महामार्गाच्या जवळच एका निर्जन स्थळी तिला घेऊन गेला. तिथे गेल्यावर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेच्या वाच्यता कुठे करून नये म्हणून त्या नराधमाने तिला धमकी दिली होती. त्यामुळे तिच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल तिने पालकांनाही सांगितलं नाही.
पीडित मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीचा जबाब यावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या या कृत्यामुळे पोलिसांना शोध लावण्यासाठी काही अडचणी येत आहेत. पण पोलिसांनी अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची शोध लवकरात लवकर लावला जाइल आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अंभोरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी दिलं आहे.


stay connected