पल्स पोलिओ मोहिमेचा आष्टीत शुभारंभ; आ. सुरेश धस यांचा जनतेला सहभागाचा संदेश
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज सकाळी 7.45 वाजता आष्टी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आ. धस यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे आवाहन केले. "पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने जबाबदारीने या मोहिमेत सहभागी व्हावे," असे आ.सुरेश धस यांनी सांगितले.
या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे,डॉ.गिरी,डॉ.गुट्टे, जालिंदर पोकळे,नगरसेवक शरीफ शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

stay connected