राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स २०२६ पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आष्टी तालुका युवा पत्रकार संघातर्फे आयोजन
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव
आष्टी। प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी, जि. बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स २०२६ पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व जनहिताचे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार असून, राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल मेघनंद लॉन्स अँड रेस्टॉरंट, सावेडी, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते, मराठवाडा भूषण सुरेश (आण्णा) धस भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संग्राम (भैय्या) जगताप (अहिल्यानगर), आमदार काशिनाथ दाते (पारनेर), आमदार अक्षय (दादा) कर्डिले (राहुरी), श्रीमती ज्योतीताई गाडे (महापौर, अहिल्यानगर), पोपटराव पवार (पद्मश्री, कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र राज्य), ह.भ.प. महंत काशिनाथ महाराज (श्री क्षेत्र गणेश गड संस्थान, नागतळा), धनंजय जाधव (उपमहापौर, अहिल्यानगर) तसेच संपत बारस्कर (ज्येष्ठ नगरसेवक, अहिल्यानगर) उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
श्रीमती सुधाताई कांकरिया (समाजसेविका व प्रसिद्ध नेत्रतज्ञ, अहिल्यानगर,अनिल लगड (अध्यक्ष, पत्रकार संघ अहिल्यानगर), मनसुरभाई शेख (राज्य कोषाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद), श्रीमती रेश्माताई आठरे (महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, अहिल्यानगर),श्रीमती रेश्माताई जगताप (सातारा जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट),श्रीमती डॉ. स्वातीताई जाधव (शिवसेना महिला आघाडी शिंदे गट, जिल्हाप्रमुख, अहिल्यानगर,गणेश मोकाशी (राज्य उपाध्यक्ष, आ.भा.म.प.परिषद, महाराष्ट्र), श्रीमती सुवर्णाताई गि-हे (उपविभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र) आणि श्रीमती रेणुकाताई वराडे (अध्यक्षा, रणरागिनी महिला ग्रुप, नगर जिल्हा), ) यांचाही विशेष सहभाग राहणार आहे.
यंदाचे वर्ष हे या पुरस्कार सोहळ्याचे आठवे वर्ष असून, गेल्या सात वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र आयकॉन्स पुरस्काराने गौरविण्याची परंपरा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी, उद्योग, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते.
या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अविनाश कदम (अध्यक्ष, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ तथा बीड जिल्हा उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन समिती कार्यक्रमाच्या तयारीत कार्यरत आहे. संयोजन समितीत उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव गहिनीनाथ पाचबैल, संतोष नागरगोजे, समीर शेख, अतुल जवणे, प्रेम पवळ,निसार शेख, राजेंद्र लाड, अक्षय विधाते, सोपान पगारे, ॲड. किशोर निकाळजे, सिताराम पोकळे (जेष्ठ पत्रकार), सय्यद बबलू, मनोज सातपुते, विठ्ठल राख, दादा पवळ, अमोल जगताप, अशोक कुताळ, आदिनाथ ठोंबरे, संतोष तांगडे, मारुती सत्रे, अतुल जाधव, किरण शिनगिरे, ओंकार कदम, संस्कार लाड, सचिन पवार आदींचा समावेश आहे.राज्यभरातील पत्रकार, समाजसेवक, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा पुरस्कार सोहळा कर्तृत्ववान व्यक्तींना प्रेरणा देणारा आणि समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्याचे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



stay connected