तुळसाबाई जंजिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन

 

तुळसाबाई जंजिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन



आष्टी | प्रतिनिधी

आज, शुक्रवार दि. १२ जून रोजी तुळसाबाई रावसाहेब जंजिरे (भाभी) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जंजिरे कुटुंबीयांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या वृत्तीमुळे आणि कुटुंबाला प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवण्याच्या जिद्दीमुळे त्या आजही सर्वांच्या स्मरणात जिवंत असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

जंजिरे कुटुंबाला समाजात मानाचे स्थान मिळवून देणारे ह.भ.प. कै. भासाहेब दादा हे थोर स्वातंत्र्यसैनिक, संस्कृत पंडित, शिक्षणप्रेमी आणि अन्नदान-ज्ञानदानाची परंपरा जोपासणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे थोरले चिरंजीव ह.भ.प. कै. रावसाहेब (आबा) जंजिरे हे धार्मिक वृत्तीचे, करारी आणि शिस्तप्रिय होते. देवपूजा, ग्रंथवाचन आणि चातुर्मासाचे पालन त्यांनी आयुष्यभर अखंडपणे केले.

आबांच्या कडक शिस्तीच्या आणि धार्मिक जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तुळसाबाई जंजिरे यांनी धैर्य, संयम आणि जिद्दीच्या बळावर संसार आणि परमार्थ यांचा सुंदर समतोल साधला. कुटुंबातील प्रत्येकाला मायेने जपणाऱ्या भाभी या कुटुंबासाठी आईसमान होत्या.

या दांपत्याला ह.भ.प. कै. नवनाथ रावसाहेब जंजिरे आणि हणमंत रावसाहेब जंजिरे हे दोन पुत्र आहेत. नवनाथ जंजिरे हे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे, सर्वांना मदतीचा हात देणारे आणि प्रेमाने सर्वांना जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. मात्र त्यांच्या अकस्मात अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

आज आबा, भाभी आणि भाऊ यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हणमंत जंजिरे यांच्यावर आली आहे. मात्र ज्येष्ठांनी दिलेले संस्कार, प्रेम आणि मूल्यांच्या बळावर त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

तुळसाबाई जंजिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे स्मरण करताना, त्यांनी दिलेले प्रेम, संस्कार आणि कुटुंब एकत्र ठेवण्याची शिकवण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी तान्हाजी जंजिरे, तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ, आष्टी यांनी तुळसाबाई जंजिरे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली. 🙏💐



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.