जि. प. प्राथमिक शाळा निळा येथील मुख्याध्यापक निळकंठे सेवानिवृत्त; उद्या सेवापूर्ती गौरव सोहळा
लोहा (प्रतिनिधी/चंद्रकांत वाघमारे)
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा येथील मुख्याध्यापक श्री. निळंकंठे गौतम मरीबा हे आपल्या प्रदीर्घ आणि आदर्श सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'सेवापूर्ती गौरव व सत्कार समारंभाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा, ता. लोहा येथे पार पडणार आहे.हा सोहळा सर्व शिक्षक वृंद, शालेय शिक्षण समिती आणि श्री. बरूरे सर (जि. प. शाळा निळा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सन्मान सोहळ्याला आणि सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी आणि पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. "सेवा संपली तरी आदर्श कायम जीवंत राहतो" या भावनेने हा कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे.


stay connected