मुस्लिम धर्माच्या पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी लोहा पोलिसांत तक्रार दाखल.

 मुस्लिम धर्माच्या पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी लोहा पोलिसांत तक्रार दाखल.



लोहा:-चंद्रकांत वाघमारे 


मुस्लिम धर्माच्या पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी लोहा पोलीस स्टेशनमध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते लदाफ निहाल अहेमद अखिल अहेमद (मुस्लीम समाज सदर) रा. कलालपेठ जुना लोहा यांनी आज दि 23/06/2026 रोजी नाजीया इलाही खान भाजपा नेता यांनी मुस्लिम धर्माचे गुरु पैगंबर  यांच्याबाबत सार्वजनिकरित्या/सोशल मीडियावर/सभेमध्ये आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केले आहे.सदर वक्तव्यामुळे माझ्यासह मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

म्हणून आपण या प्रकरणाची चौकशी करून लागू असलेल्या काय‌द्यांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.यावेळी मौलाना युसुफ रज़ा साहब, हाफीज़ अबरार रज़ा साहब,रमज़ान कुरेशी,गफ्फार कुरेशी,अजिज़ कुरेशी,सिराज,अमिन,सलिम,मैनोद्दीन,सत्तार ,

अमिर,नब्बु,बबलु आदींची उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.