*पंतांनी महाराष्ट्र नासवला जाती जातीत भांडणे लावून माणसात माणूस ठेवला नाही-डॉ जितीन वंजारे*
महाराष्ट्र मध्ये गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जेव्हापासून पंत एका विशिष्ट पदावर बसलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. सुरुवातीला हिंदू मुस्लिम त्यानंतर मराठा दलित, वंजारी-मराठा आणि आता महार-मांग म्हणजे तस्तम सर्वच जातीमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक एकात्मता भंग करण्याचे काम या ठिकाणी होत आहे.काही जातीवादी धर्मवादी संघटना यामध्ये तेल टाकत आहेत.नवतरुणांची माथे भडकवत आहेत.शेतकऱ्याची कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवून येथील तरुणांनी शासनाला जबाब विचारायला हवा, तात्कालीन सरकार आल्यापासून 90 वेळेस पेपर फुटी झालेली आहे आपल्या पाल्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न मिटत नाहीयेत, आपल्या पालकांचे शेतकऱ्यांचे शेतीच्या समस्या सुटत नाहीत, नदीजोड प्रकल्प, पाणी आडवा पाणी जिरवा, तळे तलाव मोठे प्रकल्प,शेतकऱ्याला कर्जमाफी, पीक कर्ज, विमा,अनुदान, दुष्काळ उपाय योजना,महागाई, विकास, भ्रष्टाचार,राम मंदिर 200 करोड चोरी, अत्याचार अन्याय इत्यादीवर चर्चा होत नाही फक्त हिंदू मुस्लिम, जातीयवाद अन धर्मवाद करून मूळ मुद्दे लपवले जातं आहेत.कुठल्याच गोष्टी सरकारतर्फे सहजासहजी मिळत नाही सर्वांसाठी आंदोलने उपोषणे रास्ता रोको करावे लागत आहे परंतु अंधभक्त तयार करून समाज एकमेकांना लढवत ठेवून फुकटचे राशन आणि फुकटच भाषण देऊन केवळ समाजामध्ये तेढ निर्माण ठेवून अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न निर्माण केला आहे त्यामुळे इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण, पेपर लीक,भ्रष्टाचार, इंधन दरवाढ या सर्वच गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे यामागे विशेष सरकारी यंत्रणा राबवल्या जात असून सरकार पूरक काय विशिष्ट जातीवादी संघटना येथील तरुणांचे माथे भडकावत आहे. आजकाल जो तो रस्त्यावर उतरत आहे परंतु कशासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे सार्वजनिक प्रश्न आहेत जे सर्वांचे प्रश्न आहेत त्या सर्वांसाठी सर्वांनी एकत्र होऊन लोकशाही प्रस्थापित करून लोकांनी लोकांसाठी लोकांकडून जी शासन पद्धती चालवली गेली पाहिजे ती इथे होताना दिसत नाही इथे फक्त आणि फक्त मी आणि माझा समाज यासाठीच भांडणे लावली जात आहे.तोडो फोडो राज्य करो अशा पद्धतीची कूटनीती पंतांनी या ठिकाणी चालू केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा धार्मिक एकात्मता राहिलेली नाही हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे यासाठी नव तरुणांनी एकत्र आलं पाहिजे भडकवणाऱ्याची माथी फोडली पाहिजे सामाजिक एकात्मता टिकली पाहिजे येथील शासकीय संरक्षण यंत्रणा पोलीस सत्तेचे गुलाम झालेले आहेत आणि म्हणून सामान्य माणसाला न्याय मिळणं प्रचंड कठीण झालेला आहे. येथे चौकीदार ही चोर आहे स्वतःला रामाचा भक्त म्हणणारे राम मंदिरातील पुजारी आणि ट्रस्ट समिती सर्रासपणे सीसीटीव्ही मध्ये समोर चोरी करत आहे ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या ते सर्रासपणे तिजोरी लुटत आहेत, सरकारी तिजोरी मते मिळवण्यासाठी वापरत आहेत ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था दिला ते रक्षकच भक्षक होत आहेत बलात्कार, अत्याचार, अन्याय,भ्रष्टाचार महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे परंतु आम्ही फक्त आणि फक्त जातीमध्ये आणि धर्मामध्ये गुंतलो आहोत आपले मूलभूत प्रश्न सरकारकडून च्या अपेक्षा या दूर ठेवल्या गेलेल्या आहेत आणि हे मुद्दामून होत आहे सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न, येथील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे परंतु महाराष्ट्राचे दुर्दैव, पंतांच्या राज्यामध्ये सदनाचा बहुतांश काळ खरात बाबांच्या दुष्कर्मावर वर वाया घातला जातोय, येथील चालीस आमदाराच्या बायका खरात चे मूत्र प्राशन करत आहेत, त्याची टेबल सेवा करत आहेत म्हणजे आपली किती अधोगती आहे हेच यावरून स्पष्ट होत आहे.
मुद्दामहून काही विशिष्ट महापुरुषांना टार्गेट केलं जात आहे विशिष्ट समाजातल्या जाती विशेष टार्गेट केल्या जात आहेत, त्यांना भडकावलं जातं आहे.काही महापुरुषांची पुतळे तोडले फोडले जात आहेत, मुद्दामहून त्यांची विटंबना केली जात आहे जेणेकरून जातिवाद आणि धर्मवाद हा असाच चिघळला गेला पाहिजे यातून सर्व मीडियाचे लक्ष आणि सर्व समाजकार्य कर्त्यांचे लक्ष शासनाच्या ध्येयधोरणावरून हटवून असल्या चिल्लर गोष्टीकडे जाईल आणि सभागृहामध्ये विशिष्ट चुकीचे कायदे स्थापन करून येथील सर्वसामान्यांना सर्रासपणे लुटण्याचे काम पंत करीत आहेत आणि त्यांचे वंशज मंदिरामध्ये डाका टाकत आहेत सीसीटीव्ही मध्ये उघडपणे मंदिरात चोरी करत आहे.ज्या देवाला स्वतःच्या मंदिरातील चोरी थांबवता येत नाही तो तुमचं कितपत भलं करेल हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे येथील धर्मवादी संघटना राम मंदिर बांधण्यासाठी जितक्या आक्रमक होत्या त्यातील एकही संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते राम मंदिरात चोरी झाल्यावरती समोर येताना दिसत नाहीत आज पर्यंत दुष्काळामध्ये किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तुरळक धर्मस्थळे सोडता इतर धर्मस्थळे फक्त पुजारांनीच लुटली आपल्या कामाला कधीच आली नाहीत त्यामुळे येथे धर्मस्थळे बांधण्यापेक्षा शाळा महाविद्यालय बांधणे जास्त गरजेचे आहे असे विचार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.


stay connected