धानोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत मारली बाजी
आष्टी प्रतिनिधी - येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धानोरा या महाविद्यालयाने या ही वर्षी एच एस सी बोर्ड परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम राखत बाजी मारली आहे. फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या एच एस सी बोर्ड परीक्षेत धानोरा महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 94.22%, कला शाखेचा 84.9%, वाणिज्य शाखेचा 96.92% निकाल लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून याही वर्षी आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतून निकिता कैलास काळे 84.33% प्रथम, प्रतीक अशोक काकडे 83.17% द्वितीय, आर्यन शरद विधाते 82.83% तृतीय, कला शाखेमधून पूनम गोविंद घनवट 70 % प्रथम, शहाबाई ईश्वर पवार 68% द्वितीय, आवडी कैलास मोरे 66.83% तृतीय, तर वाणिज्य शाखा रुपेश सोन्याबापु जाधव 66.67% प्रथम, स्वप्निल अशोक दिसागत 65% द्वितीय, योगिता अशोक आजबे 64.33% तृतीय आलेले आहेत. यावर्षी एकूण 360 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. या महाविद्यालयामध्ये एमएचटी -सीइटी/जेईई/नीट/एनडीए चे वर्गही घेतले जात आहे. तसेच विज्ञान शाखेचे प्रात्यक्षिक दुपारच्या सत्रात घेत आहेत, तसेच प्रत्येक पाठावर युनिट टेस्ट घेतली जात आहे. शिक्षणासोबतच या महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये चमकलेले आहेत. त्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्सद्वारे मोफत मार्गदर्शन सुरू करण्याचा मानस प्राचार्य डॉ वाघुले यांनी केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबविले जात आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, प्रशासन अधिकारी शिवदास विधाते, डी बी राऊत, माऊली बोडखे, सागर वाघुले, संदीप नन्नवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाघुले, उपप्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे, स्टाफ सेक्रेटरी प्रा निसार शेख आदींनी केले आहे.




stay connected