HSC विज्ञान शाखेत आरुष तुवर तालुक्यात सर्वप्रथम

 HSC विज्ञान शाखेत आरुष तुवर तालुक्यात सर्वप्रथम



(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या निकालात पाथर्डी तालुक्याने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तालुक्यातील आरुष तुवर या विद्यार्थ्याने  बाबूजी आव्हाड महाविद्यालयातून विज्ञान शाखेत घवघवीत यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद्द आणि चिकाटीचे फळ आरुष तुवर याने विज्ञान शाखेत ८५.१७ % मिळवत अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून आपले अव्वल स्थान निश्चित केले. अभ्यासाचे चोख नियोजन आणि सातत्य यांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. 


विज्ञान शाखेत पाथर्डी तालुक्यात प्रथम क्रमांक

(गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांसारख्या कठीण विषयांत आरुष ने विशेष प्राविण्य मिळवले आहे.)


"माझ्या या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि माझ्या शिक्षकांना जाते. भविष्यात मला अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे "

— आरुष तूवर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.