*राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा कथा साहित्य पुरस्काराने.. कथालेखक बाळासाहेब देशमुख सन्मानित*
अहिल्यानगर :- 28 वे राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलन शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक राजेंद्र फंड हे होते. त्यांच्या समवेत आयोजक जेष्ठ कवी विलास पाटील कोल्हापूर, प्रमुख पाहुण्या सुमन देसाई मुंबई, पारितोषिक वितरण पाहुणे माया नवथर संभाजीनगर हे मान्यवर होते.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना.. राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा कथा साहित्य पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याप्रसंगी बोलताना संमेलन अध्यक्ष साहित्यिक राजेंद्र फंड म्हणाले 'आपल्या कथा निर्मितीतून संस्कृती, परंपरा आणि मानवी मूल्यांचे जतन होत असून ,समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य ,आपण सातत्याने करत आहात. ही अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे.'
पारितोषिक वितरण पाहुणे माया नवथर आपल्या भाषणात म्हणाल्या
'आपल्या शब्दातून व्यक्त होणारी भावनांची खोली ,समाज मनाला स्पर्श करणारी विचारसरणी आणि साहित्यिक अभिव्यक्तीतील सर्जनशीलता, ही खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या कथा निर्मितीतून, संस्कृती, संवेदना व मूल्यांची जपवणूक होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे..'
बाळासाहेब देशमुख यांचे कथालेखन, कथाकथन कार्यक्रम सदोदित होत असतात. रंग माझा वेगळा, माणसे अशी अन् तशीही.., माणसं भिंगातून.. हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत.
या साहित्य संमेलनास महाराष्ट्राच्या विविध भागातून, अनेक साहित्यिक मान्यवर , बहुसंख्येने आलेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ वाडेकर यांनी केले. साहित्य संमेलनाचे आभार प्रदर्शन आयोजक विलास पाटील यांनी केले.


stay connected