जायकवाडी वसाहत येथील विश्वशांती बौध्द विहार येथे बुद्ध जयंती साजरी

 जायकवाडी वसाहत येथील विश्वशांती बौध्द विहार येथे बुद्ध जयंती साजरी



-------------------

लोहा /चंद्रकांत वाघमारे

पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारूणीक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती जायकवाडी वसाहत येथील विश्र्वशांती बौध्द विहार येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

            लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त बी.बी. गायसमुद्रे यांच्या पुढाकारातून विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित उपासक उपासिका यांना खीरदान करून भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार बी बी गायसमुद्रे,अनिल दादा गायकवाड विनोद महाबळे बालाजी आरसुलवाड,बाळासाहेब बुद्धे,विलास सावळे आधी सह मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.