निळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026

 *निळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी*




*लोहा* : प्रतिनिधी, चंद्रकांत वाघमारे  

*निळा, ता. लोहा* : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निळा, ता. लोहा येथे मोठ्या उत्साहात व सामाजिक एकोप्याने साजरी करण्यात आली.


सकाळच्या सत्रात ग्रामसेविका सौ. गोदावरी ताई सोनकांबळे, सरपंच बालाजी गजले व उपसरपंच गजानन मोरे यांच्या हस्ते पंचरंगी व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प व धूप अर्पण करून पूजन करण्यात आले.


दुपारच्या सत्रात सायं. 5 वाजता दरवर्षीप्रमाणे गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात निळा येथील समस्त बौद्ध बांधव व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. "जय भीम" व "जय शिवराय" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. 


गावातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत जयंती सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. भीमजयंती मंडळ व वैशाखी बुद्ध विहार, निळा यांच्या वतीने सर्व समाजबांधव व पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.