🚨 भरधाव वाहनाची धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर 🚨 Dadegaon Accident

 

🚨 भरधाव वाहनाची धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर 🚨

🚨 भरधाव वाहनाची धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर 🚨


दादेगाव (जि. बीड) : पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री खरेदी करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील बाबासाहेब जनार्धन शिंदे (वय ५०) हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या दुचाकी (MH 04 GV 5384) वरून कडा येथील बाजारपेठेत आले होते. शेतीमाल पावसापासून वाचवण्यासाठी त्यांनी ताडपत्री खरेदी केली होती.

खरेदी करून गावाकडे परत जात असताना कडा–देवळाळी रोडवरील डोंगरगण परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे दादेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. शिंदे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.