पत्रकार राहुल तारु क्रीडा व पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय छत्रपती समाज भूषण पुरस्कार जाहीर.

पत्रकार राहुल तारु क्रीडा व पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय छत्रपती समाज भूषण पुरस्कार जाहीर.



नांदेड :-चंद्रकांत वाघमारे 


आश्रयआशा फाऊंडेशनच्या वतीने 

राज्यस्तरीय शिवछत्रपती 

 समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ 2026 हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक 25 एप्रिल  2026 वार शनिवार ठीक सकाळी 10 वाजता 

ठिकाण हरिकेश लाँन्स बँकवेट हाॅल दौलती शाळेजवळ  दाभाडी रोड, मालेगांव कॅम्प जि. नाशिक येते होत आहे

 आश्रय आशा फाऊंडेशन च्यावतीने सामाजिक चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील  वाजेगाव येथिल   पत्रकार राहुल आनंदराव तारु यांना 

आश्रयआशा  फाऊंडेशन च्या वतीने

राज्यस्तरीय शिवछत्रपती समाज भूषण पुरस्कार 2026 साठी तुम्ही केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तुमची निवड करण्यात आली आहे.


        असे शिवछत्रपती पुरस्कार निवड समितीचे मुख्य आयोजक राजेंद्र पाटील राऊत  सर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

   वाजेगाव   येथील पत्रकार राहुल आनंदराव तारु  हे मागील अनेक वर्षापासून आपल्या सामाजिक कार्याची ओळख ही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर आणून तळागळातील लोकांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवले व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे पत्रकार राहूल तारू  यांच्या कार्याची दखल

 आश्रय आशा फाऊंडेशन च्या वतिने  छत्रपती समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराचे मानकरी म्हणून वाजेगाव येथिल  ता.जि.नांदेड   येथील पत्रकार  राहुल तारु   यांची निवड करण्यात आली आहे सदरील सोहळा

हरिकेश लाँन्स बँकवेट हाँल दौलती शाळेजवळ  दाभाडी रोड मालेगांव कॅम्प येथील मान्यवरांच्या व  आश्रयआशा  फाऊंडेशन  समीती च्या उपस्थितीत  संपन्न होणार आहे.


  राज्यस्तरीय शिवछत्रपती समाज भूषण पुरषकार मिळाल्याबद वाजेगाव  ,येथिल मान्यवरांनी व मित्रमंडळींनी नांदेड जिल्हातील  शासकीयअधिकारी, पदाधिकारी व   पत्रकार मित्र परिवार  यांच्यासह राहुल तारु यांच अनेकांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.