धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान उत्साहात संपन्न आष्टी तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरामुळे ग्रामस्थांना विविध महसूल सेवा थेट गावात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदत्त भैय्या धस उपस्थित होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, नायब तहसीलदार सिरसेवाड, दुय्यम निबंधक घनशाम खेडसकर, परमेश्वर काका शेळके, अंकुशराव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ औंदकर यांनी केले तर प्रस्ताविक नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांनी मांडले. कार्यक्रमात बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि पुण्याचे कार्य असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत शिवरस्ते ३३ फूट रुंदीचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे तात्काळ मार्गी लागत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतरस्ते अडवणाऱ्यांना शासकीय लाभ मिळणार नाहीत, त्यामुळे सामंजस्याने हे प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगितले. विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसाठी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना जयदत्त धस यांनी महसूल मंडळातील १५ महत्त्वाच्या सेवा नागरिकांना घरपोच देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले. पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून डिजिटल युगात नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी हे अभियान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी परस्पर सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते ई-शिधापत्रिका, विविध शासकीय प्रमाणपत्रे तसेच जिवंत सातबारा वाटप करण्यात आले. अनेक नागरिकांनी उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्या आणि प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यात आली. या अभियानामुळे प्रशासन थेट नागरिकांच्या दारी पोहोचल्याची भावना निर्माण झाली असून, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी मंडलाधिकारी एस. एम. राठोड, ग्राम महसूल अधिकारी गव्हाणे साहेब, नामदेव गवळी, दादाराव गवळी, गोरे साहेब, सौ. सविता सुभाष शेळके, केशव ननवरे, ज्ञानेश्वर साबळे, पूजा धोंडे तसेच तहसील कार्यालय व धानोरा महसूल मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान संपन्न






आष्टी तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरामुळे ग्रामस्थांना विविध महसूल सेवा थेट गावात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदत्त भैय्या धस उपस्थित होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, नायब तहसीलदार सिरसेवाड, दुय्यम निबंधक घनशाम खेडसकर, भागिरथ धारक , ओव्हाळ साहेब , परमेश्वर काका शेळके, अंकुशराव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ औंदकर यांनी केले तर प्रस्ताविक नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांनी मांडले.

कार्यक्रमात बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि पुण्याचे कार्य असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत शिवरस्ते ३३ फूट रुंदीचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे तात्काळ मार्गी लागत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

तहसीलदार वैशाली पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतरस्ते अडवणाऱ्यांना शासकीय लाभ मिळणार नाहीत, त्यामुळे सामंजस्याने हे प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगितले. विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसाठी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना जयदत्त धस यांनी महसूल मंडळातील १५ महत्त्वाच्या सेवा नागरिकांना घरपोच देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले. पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून डिजिटल युगात नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी हे अभियान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी परस्पर सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते ई-शिधापत्रिका, विविध शासकीय प्रमाणपत्रे तसेच जिवंत सातबारा वाटप करण्यात आले. अनेक नागरिकांनी उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्या आणि प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यात आली. या अभियानामुळे प्रशासन थेट नागरिकांच्या दारी पोहोचल्याची भावना निर्माण झाली असून, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी मंडलाधिकारी एस. एम. राठोड, ग्राम महसूल अधिकारी गव्हाणे साहेब, नामदेव गवळी, दादाराव गवळी, गोरे साहेब, सरपंच सविता सुभाष शेळके, राजाभाऊ शेळके , नामदेव शेळके , आजिनाथ शेळके , केशव ननवरे, ज्ञानेश्वर साबळे, पूजा धोंडे तसेच तहसील कार्यालय व धानोरा महसूल मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.