लोहा - कंधार बांधकाम कामगार स्थानिक स्वराज्य नियंत्रण समिती गठीत

 लोहा - कंधार बांधकाम कामगार स्थानिक स्वराज्य नियंत्रण समिती गठीत







नांदेड : चंद्रकांत वाघमारे 

कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या बांधकाम कामगार स्थानिक सहनियंत्रण समिती लोहा कंधारच्या अध्यक्षपदी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती नुकतीच गठित करण्यात आली आहे. 

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर अध्यक्ष असलेल्या या समितीत सदस्य म्हणून अविनाश उद्धवराव सूर्यवंशी , अर्जुन रामा राठोड , कल्पना किशनराव गीते , धनाजी देवराव आढाव यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीच्या सहअध्यक्ष पदाबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे.  लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी ही समिती काम करणार असून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतील अशी माहिती आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.