उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या कडून माजी आ. भीमराव धोंडे यांची मागणी मान्य, बीड येथे होणार स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

 उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या कडून माजी आ. भीमराव धोंडे यांची मागणी मान्य, बीड येथे होणार स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 




आष्टी ( वार्ताहर ):- ऑलिम्पिक पदक विजेते, भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा-२०२६ बीड येथे आयोजित करण्याच्या माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मागणीला यश आले. उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनाबाबत निर्णय झाला.

       महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे  यांनी ही मागणी केली होती‌. या मागणीची दखल घेत ना. सुनेत्राताई पवार यांनी  मागणी मान्य केल्याने जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींना पर्वणी मिळणार आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा - २०२६ चे आयोजन बीड येथे करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मान्यता दिलेली आहे.

क्रिडा क्षेत्राविषयी अत्यंत आवड असलेले कुस्तीपटू व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी भीमराव धोंडे यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे घेण्याची मागणी मान्य झाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यातील समृद्ध कुस्ती परंपरेला नवे बळ मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक होतकरू मल्लांना आपल्या ताकदीचे व कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच युवा पिढीमध्ये पारंपरिक मातीतील कुस्तीबद्दल नव्याने प्रेरणा निर्माण होण्यासही मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित होणार असल्याने जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, मल्ल आणि कुस्ती परंपरेशी जोडलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागणीची दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे  माजी आमदार भीमराव धोंडे यांनी  आभार मानले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.