Success Story : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हर्षलने सीए पदाला घातली गवसणी..
-----------------–----
कडा : राजू म्हस्के:-
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले,हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे,शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली,भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली....
या ओळी आहे कवी नारायण सुर्वे यांच्या "भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. सारी हयात पोटाची खळगी भागवण्यासाठी केली जाणारी धडपड या कवीनी अतियश समर्थपणे शब्दात मांडली आहे. सुख दुःखाची माळ गुंफूण हसत रडत केला जाणारा हिशोबाच्या ताळेबंद लावता लावता आयुष्य अलगद निसटून जाते.तारीखाचा घोळ संपला की परत एका नववर्षाची सुरूवात होते. यंदाचा या वर्ष सुध्दा स्वप्नपूर्तीसाठी हिशोबाची ताळमेळ करून,सुख दुःखाचा ऋतू संगे नामे जिंदगीची गाडी पुढे ढकलली गेली.नव्या दिशेने,नव्या उमेदीने, नव्या जोमाने पावलाची परिक्रमाकरून निरंतर चालत राहावे मध्येच जरा क्षणभर विसावा घेवून आपल्याच अवतीभोवती असलेल्या मी पणाच वलय झटकून आपल्या माणसाचा भावबंधात जरा थबकून जातो.आयुष्य हे असच असत. मनासारख जगण्यासाठी एक वेगळीच तपस्या करावी लागते, ती तपस्या आज पूर्ण करण्यात हर्षल यशस्वी झाला..
<<आष्टी तालुक्यात सतत पडणाऱ्या दुष्काळी भागातील गहूखेल सारख्या अति दुर्गम डोंगराळ भागात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले ज्ञानदेव म्हस्के यांची घरची परिस्थिती तशी हलाखीचीच.. पहाडपट्टी सारख्या ग्रामीण भागात कुटुंबाला अगदी जेमतेम शेती असल्याने उदरनिर्वाहासाठी अडचणी येत होत्या.परंतु आहे त्या परिस्थितीत दहावी नंतर कौशल्य विकास आणि उद्योजक ( ITI ) अंतर्गत व्यावसायिक व विविध तांत्रिक आणि गैर- तांत्रिक ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियन शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात शहर गाठून पुणे, हैद्राबाद याठिकाणी काम केले.सध्या ते सुपा येथे खाजगी कंपनीत इलेक्ट्रिशयन म्हणून काम करत आहेत त्यांना दोन मुलं असून एक शिक्षण घेत आहे तर दुसऱ्या मुलगा हर्षल... हर्षलने मात्र आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले व त्यांच्या स्वप्नाला मोठी उभारी दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुण्यासारख्या महागड्या ठिकाणी मालानी,सोमानी, चांडक असोसिएट डेक्कन पुणे येथे त्याची आर्टिकल शिप झालेली आहे परंतु अजूनही एक महिना बाकी असताना त्याने अगोदरच परीक्षा दिल्याने उत्तीर्ण होऊन त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याला अडीच वर्षानंतर फायनल देता येते त्यामुळे त्यांनी खूप अभ्यास करून फायनल दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाला आहे अभ्यासात सतत सातत्य ठेऊन कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) परीक्षा पास झाला आहे.शिक्षणामुळे जीवनात क्रांती घडते, परिस्थिती कितीही बिकट आणि हलाखीची असली तरी शिक्षणातून आर्थिक क्रांती घडविता येते,असे बाळकडू वडिलांनीच त्याला दिले होते याची प्रचिती त्याने आपल्या कृतिशील कार्यातून दाखवून दिली आहे.
◆शिवणकाम करून हातभार...
हर्षलच्या आईने शिवणकाम करून आपल्या वडिलांच्या मेहनतीला साथ दिली, वडिलांनीही मेहनतीचे व कठीण काम करत त्यांनी या कंपणीला आपली लक्ष्मी समजून अखंडपणे काम करून प्रसंगी वोअर टाईम करून संसाराचा गाडा हाकत आपले काम सुरू ठेवले.उदरनिर्वाहा साठी जेमतेम उत्पन्न मिळत असे, पण मुलांच्या शिक्षणाची चिंता मात्र सतत टोचत होती म्हणून ज्ञानदेव यांच्या पत्नी यांनीही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून रात्रंदिवस शिवणकाम करून मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही मुलांपैकी एक वडिलांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन शिक्षणात भरारी घेत आहे तर दुसरा चार्टर्ड अकाउंट सारखी कठीण परीक्षा देऊन यशाचा शिखरावर पोहचला आहे.
◆कोरोनासारख्या महामारीशी दोन हात....
कोरोनाने ज्ञानदेव म्हस्के यांना घेरले होते,दवाखान्यात मोठया प्रमाणात खर्च करावा लागला, आर्थिक व मानसिक संकट कोसळले. उत्पन्नाचे स्रोत ठप्प आणि आरोग्याची भीती अशा दुहेरी संकटांना सामोरे जात असतानाही एका जिद्दी वडिलांनी हार न मानता परिस्थितीशी दोन हात केले पण मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांचे शिक्षण थांबता कामा नये," असा ठाम विश्वास त्यांनी जपला.दिवस- रात्र मेहनत करून त्यांनी केवळ कुटुंबाचा सांभाळच केला नाही, तर मुलाला अभ्यासासाठी आवश्यक वातावरणही उपलब्ध करून दिले.


stay connected