महात्मा गांधी संकुलात महिलांचा सन्मान

 *महात्मा गांधी संकुलात महिलांचा सन्मान* 






 *प्रवरानगर( वार्ताहर ):* प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते. एका स्त्रीला घर सांभाळून प्रत्येक जबाबदारी पार पाडावी लागते. आयुष्यात प्रत्येक अडचणीला तिला सामोर जावे लागते, यावेळी प्रत्येक पुरुषांने प्रत्येक स्रीचा सन्मान केलाच पाहिजे, असे प्रतिपादन कृषिभूषण प्रभावती घोगरे यांनी प्रवरानगरच्या महात्मा गांधी संकुलात संपन्न झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.

   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा कमलताई म्हस्के पाटील आणि प्रभावती  घोगरे पाटील यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी मुख्याध्यापिका नलिनी जाधव व उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे, प्र.उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगिता सांगळे, माधुरी वडघुले, लता टावरे, देवेश आहेर, डॉ. शरद दुधाट आदी मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या अध्यक्ष  कमलताई म्हस्के यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिजाऊ आणि सावित्री सारख्या रणरागिनींच्या कार्याचा आदर्श घेऊन जीवन जगा. आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करा. आत्मवर्तन करून सन्मानाने जगा. स्वतःला सिद्ध करणारी स्त्रीच समाजाचे प्रतिनिधित्व करू शकते, असा उपदेश महिला दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

    या प्रसंगी संकुलातील सर्वच सावित्रीच्या लेकींचा शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप डहाळे यांनी केले.तसेच संगीता उगले यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.