*बोरगावमध्ये परस्पर जमीन लाटण्याच्या वादावरून धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करत खुन करण्याचा प्रयत्न*
लोहा:-प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव येथील घटना आरोपी उपसरपंच जयश्री पुंडलिक पाटील यांच्या सह त्यांचे पती पुंडलिक हारजी पाटील मुलगा अजित पुंडलिक पाटील,उद्धव साहेबराव पाटील यांनी नारायण व्यंकटराव पाटील यांच्यावर धारदार चाकू,लोखंडी रॉड, पेट्रोल भरलेल्या बाटली,चटणी पुड अशा शस्त्राने जिवघेणा हल्ला केला
दि 07मार्च2026 रोजी शनिवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास नारायण व्यंकटराव पाटील हे गावातील काही नागरीकांसोबत नेहमी प्रमाणे ओट्यावर बसले असता आरोपींनी अचानक येऊन त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला ह्या हल्यात नारायण व्यंकटराव पाटील यांच्या छातीत पुंडलिक हरजी पाटील हे चाकूने वार करत असतांना नारायण पाटील यांनी हात पुढे करत तो वार हातावर झेलला नारायण पाटील गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत दिसताच काहींनी मध्यस्ती करत सोडवा सोडव केली
जमीनीच्या वादावरुन झालेल्या ह्या जिवघेण्या हल्यात नारायण पाटील यांच्या वर उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे उपचार सुरू होते त्यांना तातडीने नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले
मागील एक वर्षापासून नारायण पाटील यांची जमीन तुम्हाला घरकुल देतो,विहर देतो असे सांगून कागदावर सही घेऊन परस्पर जमीन नावाने करून घेतल्याचे बोलले जात आहे नारायण पाटील हे हडप केल्याचा जमीन संदर्भात वारंवार पाठपुरावा करत असल्याचे व पोलिसांना तक्रार केल्याचा मनात राग धरून जिवघेणा हल्ला चढवला असल्याचेही स्पष्ट होत आहे
परस्पर जमीन लाटण्याच्या उद्देशाने धमक्या देत माझे दोन मुले पि एस आय आहेत व पोलीस प्रशासन माझ्या सोबत आहे आणि तुला तर जिवे मारल्याशिवाय सोडनार नाही अशा धमक्या देत गावातील नागरीकांमध्ये दहशत निर्माण करत सामान्य लोकांना त्रास दिला जातो
नारायण व्यंकटराव पाटील यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नं 73/2026 दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि पठाण करीत आहेत.

stay connected